आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:पैशांच्या वादातून आईने डोक्यात दगड घालून केला मुलीचा खून

मंगळवेढा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिक तपास पोलिस करत आहेत

जमीन आणि पैशांच्या वादातून सततच्या भांडणामुळे आईने झोपलेल्या मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. अनोळखी व्यक्तीने तिचा खून झाल्याचा बनाव रचला. बुधवारी (दि. ९) रात्री ११ च्या सुमारास अकोला रस्त्यावरील घराच्या गच्चीवर ही घटना घडली. पोलिस तपासात आईनेच खून केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आईला अटक केली आहे.

मंगल कुबेर नरळे (३५) असे खून झालेल्या मुलीचे तर चंदाबाई कुबेर नरळे (५५, मूळ रा. लोणार, सध्या रा. अकोला रस्ता, मंगळवेढा) असे संशयित महिलेचे नाव आहे.

बुधवारी रात्री चंदाबाई व मंगल या घराच्या गच्चीवर झोपी गेल्या. रात्री अकराच्या सुमारास चंदाबाई हिने झोपेत असलेल्या मंगलच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पहाटे तिने मुलीचा खून झाल्याची पोलिसांत फिर्याद दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गुरुवारी घटनास्थळाची पाहणी केली. संशयित चंदाबाई हिने मुलगी मंगलचा खून केल्याची कबुली दिली आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे, असे झेंडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...