आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शहरात रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण महापालिकेने हटवले

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शहर कोतवाली ते जयहिंद चौक ते किल्ला चौक या मार्गावरील वाहतुकीत अडथळा ठरलेले अतिक्रमण हटवले. लघु व्यावसायिकांनी तसेच दुकानदारांनी आपला व्यवसाय तसेच साहित्य वाहतुकीस अडथळा ठरणार नाहीत, अशा ठिकाणी ठेवावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महापालिका अतिक्रमण हटाव पथकाने २१ नोव्हेंबरपासून शहराच्या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम शहराच्या सर्व भागातील मुख्य मार्गावर राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पोलिस बंदोबस्त नसताना केवळ महापालिका अतिक्रमण हटाव पथकाकडूनच ही मोहिम राबवली जात आहे. बुधवारी ७ डिसेंबर रोजी शहर कोतवाली- लोखंडी पुल, जयहिंद चौक, राजेश्वर मंदिर रोड, किल्ला चौक या मार्गावर ही मोहीम राबवण्यात आली.

या मार्गावर रहदारीस अडथळा ठरणारे ठेले, चारचाकी गाड्या, दुकानासमोर बांधलेले ओटे काढण्यात आले तर दुकाना बाहेर ठेवलेले फलक उचलण्यात आले. या दरम्यान पक्क्या स्वरुपाच्या बांधण्यात आलेल्या दोन पानपट्टीही अतिक्रमण हटाव पथकाने जमिनदोस्त केल्या. तूर्तास काळा मारोती रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने जुने शहरातील सर्व वाहतूक जयहिंद चौक मार्गे सुुरू आहे.

जुना आरटीओ मार्गावर आज राबवणार मोहीम
जुना आरटीओ मार्गावर अतिक्रमण करुन कच्च्या स्वरुपात बांधलेल्या घरांवर कारवाई करणार आहे. त्यासाठी मनपाच्या दक्षिण झोनचे अधिकारी श्री.निकाळजे यांनी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली.

जि. प. शाळेच्या आवारात ठेवलेल्या गाड्या तोडल्या
मोहीम सुरू झाल्यानंतर काही लघु व्यावसायिकांनी आपल्या गाड्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ठेवल्या. मात्र ही जागा शासकीय असल्याने अतिक्रमण हटाव पथकाने या गाड्यांचा चुराडा केला.

बातम्या आणखी आहेत...