आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारींवर कारवाई:पालिकेने दोन दिवस थांबवली अतिक्रमण हटाव मोहीम

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध मार्गावर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला दोन दिवस विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान या दोन दिवसात अवैध बांधकाम तसेच प्राप्त तक्रारींवर कारवाई केली जाणार असून, बुधवार ७ डिसेंबरपासून मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम नियमित सुरू होईल.

महापालिकेच्या वतीने २१ नोव्हेंबरपासून शहरातील मुख्य मार्गावर टप्प्या-टप्प्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. सोमवारी ५ डिसेंबर रोजी शहर कोतवाली-जयहिंद चौक-किल्ला चौक-पोळा चौक-भांडपुरा चौक या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार होती. मात्र सोमवारी गोरक्षण मार्गावरील अनधिकृत इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अतिक्रमणाच्या आलेल्या अन्य लहान-सहान तक्रारीचा निपटारा करण्यात आल्याने मंगळवार ६ डिसेंबरपर्यंत मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला विश्रांती देण्यात आली. तर बुधवारी ७ डिसेंबरपासून मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...