आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांचा धाक!:प्रलंबित फाईल्सची तपासणी होणार म्हणून पावणे दहा वाजताच कर्मचारी मनपात हजर

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयुक्तांच्या धास्तीमुळे 2 सप्टेंबर रोजी महापालिका कार्यालय पावणे दहा वाजता कर्मचाऱ्यांनी फुलुन गेले होते. विशेष म्हणजे वेळेच्या आत येऊनही येणारा प्रत्येक कर्मचारी मॅडम आल्या का? याची पडताळणी करत होते. यासाठी निमित्त ठरले होते आयुक्तांच्या पेंडिग फाईल्स तपासणीचे. मात्र ही तपासणीच न झाल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

दर महिन्याला दिले जाते वेतन

महापालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून दह महिन्याच्या एक तारखेला वेतन दिले जाते. त्याच बरोबर रजारोखीकरण, सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम, महागाई भत्ता आदी सर्व थकीत देणी देणे प्रशासनाने सुरु केले आहे. त्यामुळे आता वेतन वेळेवर मिळत असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याने वेळेवर कार्यालयात कर्तव्यावर हजर व्हावे, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. यापूर्वी तत्कालीन आयुक्तांनी अनेकदा झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत लेट लतिफ ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र यातून मनपा कर्मचाऱ्यांनी धडा घेतलेला नाही. अद्यापही काही कर्मचारी अकरा ते बारा या दरम्यान कर्तव्यावर हजर होता. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांची हम नही सुधरेंगेची भूमिका अद्यापही कायम आहे.

आयुक्तांनी केली चौकशी

दरम्यान शिस्तप्रिय असणाऱ्या आयुक्त कविता द्विवेदी यांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे कोणत्याही परिस्थितीत जास्त दिवस फाईल पेंडिग राहू नये, याबाबत सुचना केल्या होत्या. या सुचने नंतरही अनेक फाईल्स पेंडिग आहेत. त्यामुळेच आयुक्तांनी 2 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता महापालिकेच्या विविध विभागात स्वत: जावून पेडिंग फाईल्सची तपासणी करुन या फाईल्स पेंडिग पडण्यामागे नेमके काय कारण आहे? याची चौकशी करणार होत्या. आयुक्त फाईल्स तपासणार असल्या तरी त्या दररोज पावणे दहा ते दहाच्या दरम्यान महापालिकेत येतात. त्यामुळे आयुक्तांनी कार्यालयात पोचण्याआधी महापालिकेत पोचण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये जणु स्पर्धा लागली होती. परिणामी आयुक्त महापालिकेत येण्यापूर्वीच जवळपास सर्वच कर्मचारी महापालिकेत कर्तव्यावर हजर झाले.

वादळापूर्वीची शांतता

आयुक्त पेडिंग फाईल्सची तपासणी करणार होत्या. मात्र ही तपासणी आयुक्तांनी केली नाही. त्यामुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. आयुक्तांनी एकाही विभागाला भेट दिली नाही अथवा तपासणी केली नसली तरी हा प्रकार वादळापूर्वीची शांतता असल्याची चर्चा देखिल महापालिकेत झाली.

यामुळे झाला घोळ

फाईल्स तपासणी करण्याबाबतचा मॅसेज आयुक्तांच्या सुचनेप्रमाणे विभाग प्रमुखांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रृपवर टाकण्यात आला. त्यामुळे विभाग प्रमुख सतर्क झाले. त्यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना देखिल सतर्क केले, त्यामुळे घोळ झाला आणि सर्वच कर्मचारी वेळेवर कर्तव्यावर हजर झाले.

बातम्या आणखी आहेत...