आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • The Need For Rites On Children For The Nikop Generation; Commencement Of 21 Day Residential Child Rites Camp, Presence Of Dignitaries |marathi News

मान्यवरांचा सूर:निकोप पिढीसाठी बालकांवर संस्काराची गरज; 21 दिवसीय निवासी बाल संस्कार शिबिरास प्रारंभ, मान्यवरांची उपस्थिती

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांवर सुयोग्य संस्कार घडवून निकोप पिढी घडविण्यासाठी आयोजित बाल संस्कार उपक्रम काळाची गरज असल्याचा सूर बाल संस्कार शिबिरात कीर्तनकारांच्या भाषणातून निघाला. जुन्या शहरातील गुरुदत्त नगर येथील काकडा आरती मंडळ, चिंतामणी नवदुर्गा मंडळच्या वतीने डाबकी रोड परिसरातील स्व. विनयकुमार पाराशर शाळेत २१ दिवशीय निवासी बाल संस्कार शिबिरास नुकताच प्रारंभ झाला.

या संदर्भात गुरुदत्त नगर येथील काकडा आरती मंडळ, चिंतामणी नवदुर्गा मंडळच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार हभप मोतीराम महल्ले यांच्या अध्यक्षतेत हे शिबिर होत आहे. हभप बाळकृष्ण तायडे, केशवराव धोटे, हभप उमेश आर्य, हभप गोपाल जोगदंड, हभप विष्णू चोरे, हभप सुष्माताई भानुप्रिया, आळंदी येथील मार्के महाराज, के. व्ही. देशमुख, श्रीराम खराटे, डॉ. गजानन धरमकर, डॉ. अशोक ओळंबे, प्रशांत पिसे, शिबिर संयोजक हभप मोहन गोंडचवर, मंडळाचे अध्यक्ष सुनील उंबरकर, उपाध्यक्ष मंगेश वानखडे, रुपेश फाटे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर बोदडे, सचिव वसंतराव माळी, सहसचिव महेंद्र कायंदे, सहसचिव शिवाजी देशमुख आदीच्या उपस्थितीत या शिबिराचा दीप प्रज्वलन व स्वागताने प्रारंभ झाला. शिबिरात जिल्ह्यातील अनेक गावावरून बालक सहभागी झाले आहेत. मान्यवरांनी या २१ दिवसीय आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वारकरी व शैक्षणिक परंपरेचे प्रशिक्षण देणाऱ्या शिबीर उपक्रमाची प्रशंसा केली.

या शिबिरात नित्य सकाळी ६ वाजता योगासन व सामुदायिक प्रार्थना, त्यानंतर दिवसभरात हरिपाठ, गीतापाठ, संस्कृत पठण, गायन, मृद्रुग पाठ, हरिपाठ, विविध मैदानी खेळ, सामुदायिक हरिपाठ आदी शिकविण्यात येत असल्याची माहिती शिबीर प्रमुख मोहन गोंडचवर यांनी दिली. शिबिराचे प्रास्तविक पद्माकर मोरे यांनी केले. उपस्थितांचे आभार मोरे महाराज यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्जेराव देशमुख, डॉ. प्रवीण दिघोळे, सहदेवराव मेसरे, पांडुरंग बावणे, रमेश मांगटे, राजेश वर्मा, नीलेश ठोसर, राजेश भिसे, निमजे, अभिजित कदम, बंडू बोराखडे, दिलीप माळी, पंजाबराव वाघ, काशिनाथ कंनेवार, देवलाल गोंडचवर, गजानन अरबट, गजानन देशमुख, शिवम उंबरकर, सदाशिव घोगरे, सुरेश कांबरकर, श्रीकांत चोखंडे, मीनाताई उंबरकर, ज्योतीताई वावगे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, बालक व पालक उपस्थित होते, अशी माहिती गुरुदत्त नगर येथील काकडा आरती मंडळ, चिंतामणी नवदुर्गा मंडळच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...