आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महात्मा फुलेंच्या कार्याचे चिंतन करण्याची गरज

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा प्रचार, अपृश्यतेला विरोध, पुनर्विवाह समाजमान्य, बालहत्या प्रतिबंध, वंचितांच्या पालकत्वाचा स्वीकार आदी कार्यातून देशात सामाजिक चळवळीची क्रांतीज्योत पेटवली. प्रबोधनाापुरते मर्यादित न राहता त्यांनी समाजात कार्य केले. प्रत्येक कार्याची सुरुवात स्वत:च्या घरातून केली. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरू मानले. मात्र, अजूनही समाजाला या महापुरुषाच्या कार्याचे चिंतन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील नंदा फुकट यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा अकोलातर्फे साेमवार १९ डिसेंबरपर्यंत प्रमिलाताई ओक सभागृहात व्याख्यानमाला आयोजित केली. त्यात दुसरे पुष्प नंदा फुकट यांनी रविवारी ‘ज्योतिबा फुले यांची सामाजिक क्रांती’यावर गुंफले.नंदा फुकट म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. प्रत्येकांच्या हातापर्यंत लेखणी पोहाेचली पाहिजे.

यासाठी शाळा सुरू केल्या. मुलींसाठी शाळेची दार उघडली. यासाठी पत्नीला पुढे केले. हे सामाजिक क्रांतिचे पहिले पाऊल होते. शिक्षणातून सामाजातील सामाजिक, आर्थिक समस्या दूर करता येतील. यावर त्यांचा विश्वास होता. ‘विद्येविना, मती गेली...’’ हे वचन तेव्हाच जन्माला आले. सामाजिक अत्याचार, विधवा केशवपन, विधवाविवाह प्रतिबंध याला त्यांनी विरोध केला. अपृश्यतेला विरोध करण्यासाठी घरातील हौद सर्वसमाजासाठी उघडा करून दिला. वंचिताचे पालकत्व स्वीकारून समाजापुढे आदर्श प्रस्तापित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ण व्यवस्थेचा बळी ठरताना महात्मा फुलेंच्या याच सामाजिक क्रांतीचा अभ्यास केला. त्यामुळे १०८ वर्षाचा सामाजिक संघर्ष म्हणजे समानता प्रदान करणारे संविधान मिळालेे, असे या वेळी नंदा फुकट यांनी सांगितले.

व्याख्यानापूर्वी रामेश्वर गायकवाड, अविनाश तेलगोटे, दा. कि. पांडे, प्रा. मोहोड यांनी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन केले. एस. बी. खंडारे, म. ज. तायडे, राजेश पातोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक साहेबराव मोरडे यांनी केले. प्रबोधनगीत गेडाम यांनी सादर केले. संचालन अरुण वानखडे यांनी केले. राजेश तेलमोरे यांनी आभार मानले. व्याख्यानमालेला अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती.

आज बुलडाण्याच्या रवींद्र इंगळे यांचे व्याख्यान
साेमवारी १९, डिसेंबरला बुलडाण्याचे रवींद्र इंगळे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सद्धधम्म’ वर सायंकाळी ६.३० वाजता, प्रमिलाताई ओक सभागृहात मार्गदर्शन करतील. हे व्याख्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा अकोला समाज माध्यमावर लाइव्ह ऐकता येईल. येथे दररोज ५.३० वाजता भीमगीत गायनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...