आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भात हुडहुडी वाढणार:पुढील दोन दिवस थंडीसाठी अनुकूल; 20 नोव्हेंबरपर्यंत किमान तापमान 10 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 17 ते 18 नोव्हेंबरला रात्रीचे तापमान हळूहळू कमी होण्यास वातावरण अनुकूल होणार आहे

गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील थंडीची लाट कमी झाली असून तापमानात काही अंशांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, १७ ते १८ नोव्हेंबरपासून हळूहळू रात्रीचे तापमान पुन्हा कमी होऊन गारठा वाढू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करतात.

हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामानशास्त्रीय घडामोडींमुळे विदर्भात वारे पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागराकडून वाहायला लागले होते. हे वारे समुद्रावरून येत असल्याने ते काहीसे उष्ण आणि दमट असल्याने विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले. या परिणामामुळे काही दिवसांपासून थंडीही कमी झाली. मात्र आता हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशकडून येणारे थंड वारे पूर्वेकडून येणार्‍या वार्‍यांमध्ये मिसळत असल्याने १५ नोव्हेंबरला सायंकाळ पासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती राहील. मंगळवार १७ ते बुधवार १८ नोव्हेंबरला पुन्हा रात्रीचे तापमान हळूहळू कमी होण्यास वातावरण अनुकूल होणार आहे. २० तारखेपर्यंत किमान तापमान १० अंशांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...