आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण केंद्र:परिचारिका प्रशिक्षण केंद्रास नवीन वर्षात सुरुवात होणार

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रस्तावित परिचारिका प्रशिक्षण केंद्रास नवीन वर्षात सुरुवात हाेईल. जिल्हा स्त्री रुग्णालयातील १०० खाटांच्या माता व बाल संगोपन विंगमध्ये परिचारिकांना मिडवाइफरी प्रसूतिविद्येचे प्रशिक्षण मिळणार आहे.

रुग्णालयात दाखल महिलांची प्रसुती सामान्य व्हावी यासाठीचे प्रशिक्षण परिचारिकांना मिळावे या उद्देशाने हे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. नव्या वर्षात या केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्षात प्रशिक्षणात सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा राहणार असून राज्यभरातील परिचारिकांना येथे येऊनहे विशेष प्रशिक्षण घेता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...