आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका नविडणुकीचे पडघम:मनपात खुल्या जागा 74 होणार; प्रस्थापितांची राजकीय वाट प्रशस्त; राजकीय हालचालींना पुन्हा वेग

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका नविडणूक प्रक्रिया १० मार्च २०२२ रोजी असलेल्या टप्प्यापासून सुरू करावी, असा आदेश न्यायालयाने दिल्याने आिण ओबीसी आरक्षणाशविाय नविडणूक होणार असल्याने खुल्या जागांची संख्या वाढणार आहे. तूर्तास तरी तीन सदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार आहे. परिणामी मनपाच्या ९१ जागांपैकी २७ ओसीबींच्या जागा वगळण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या ४७ जागा वाढून त्या ७४ जागा होणार आहे. ही स्थिती सध्या तरी प्रस्थापित व राजकीय वजनदार असलेल्या इच्छुकांसाठी सुखावणारीच आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नविडणुका या ओबीसी आरक्षणाशविाय नको यासाठी, यासाठी सर्व राजकीय पक्ष एकवटले होते. मात्र नविडणुकांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला भाजपने घेरले होते. अशा परिस्थितीत ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत नविडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने नवीन वधिेयकाद्वारे कायदा मंजूर केला आिण राज्य नविडणूक आयोगाचे अधिकार स्वत:कडे घेतले.

तसेच नविडणूक आयोगाच्या आदेशाने यापूर्वी झालेली बहुसदस्यी प्रभाग रचना रद्द करण्यात आली होती. दरम्यान सरकारच्या उपरोक्त निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एक आदेश जारी केला होता. दोन आठवड्यात नविडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून त्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रतीक्षा प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होण्याची : मनपा नविडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घ्यावी, असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. प्रभाग रचना करण्याचे काम नविडणूक आयोगाच्या आदेशाने करण्यात आले होते. त्यानंतर मनपाने प्रभाग रचना आयोगाला सादर केली. आयोगाच्या सूचनेनुसार त्यावर हरकची व सूचना मागवून सुनावणीचीही प्रक्रिया पार पडली. प्रभाग रचनेचा अहवाल आधी नविडणूक आयोगाला व नंतर राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, अंतिम सुनावणीनंतरचा निकालच घोषित झाला नाही. अशातच नवे वधिेयक मंजूर झाल्याने ही रचनाही रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आता अंतिम प्रभाग रचनेवर केव्हा शिक्कामोर्तब होते, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...