आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविठ्ठल नाम मगजरासह 'श्री'ची पंढरपूरला निघलेली पालखी अकोल्यामध्ये पोहचली. सकाळी डाबकी रोड येथे पालखीचे आगमन झाले. दिवसभर विविध मार्गाने जात दुपारी 3 वाजता हा भव्य सोहळा मुक्कामस्थळी पोहचला. ठिकठिकाणी महाराजांच्या भक्तांनी पालखीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.
हजारो भाविकांनी घेतले दर्शन
पहिल्या दिवशी डाबकी रोडवरून पालखी सकाळी 9 वा. खंडेलवाल शाळेत पोहचली. डाबकी रोड येथे पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती. पुढे विठू नामाच्या गजरामध्ये पालखी मार्गस्थ झाली. कस्तुरबा हॉस्पीटल, विठ्ठल मंदिर, लोखंडी पुल, सिटी कोतवाली, गांधी चौक मेन, ओपन थेटर, निशांत टॉवर गल्लीतून जात मुंगिलाल बाजोरिया शाळेत मुक्कामस्थळी पोहचली. येथे टाळ-मृदंगाच्या तालावर आरती करण्यात आली. येथे भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
जल, फराळ, आईस्क्रीम वाटप
मार्गावर विविध संस्था, संघटनेच्या वतिने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांसाठी पेज, फराळ, तसेच उन्हामुळे अनेक ठिकाणी थंडपेय व आईस्क्रीमची व्यवस्था करण्यात आली होती. शहरामध्ये पालखी सोहळ्यानिमत्त चौका-चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.
आजचा पालखी मार्ग असा
मुंगिलाल बाजोरी शाळेतून पोस्ट ऑफिसजवळून कलेक्टर बंगल्यासमोरून, अशोक वाटिका चौक, खंडेलवाल भवनासमोरून नेहरू पार्क जवळू, जुने इन्कम टॅक्स चौक, पंत मार्केट समोरून, आदर्श कॉलनी शाळा क्रं. 16 मध्ये सकाळी 9 ते 12 तेथून पुढे बोबडे डेअरी जवळून सिंधी कॅम्प मार्गे जेल चौक, अशोक वाटीकामागून कलेक्टर ऑफिसजवळून, सरकारी बगीचा, खोलेश्वर, सिटी कोतवाली, जयहिंद चौक, श्री राजेश्वर मंदिर समोरून हरिहर पेठ मुक्कामी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.