आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीचा मार्ग खडतरच:प्रशासनाकडून रस्त्याची दुरुस्तीच नाही, धुळीचे लोट अंगावर घेत वारकऱ्यांची वाटचाल

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : नीरज भांगे - Divya Marathi
छाया : नीरज भांगे

गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरीच्या वारीसाठी रवाना झाली आहे. ही पालखी बुधवारी अकोल्यात पोहोचेल आणि दोन दिवस मुक्कामी राहून शुक्रवारी, १० जूनला पुढे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ होईल. दोन वर्षाच्या खंडानंतर निघालेल्या या पायी वारीचा मार्ग यंदाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे खडतरच आहे.

पारस ते अकोला दरम्यानच्या गायगाव पेट्रोल डेपो ते भौरद या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. पालखी आधी या रस्त्याची दुरुस्ती होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. रस्त्यावर खडी पडून असून या खडीतून मार्ग काढत धुळीचा लोट अंगावर घेत वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वाटचाल करावी लागणार आहे.

२ वर्षांनंतर पालखी पंढरीकडे
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी सोमवारी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली. संस्थेचे विश्वस्त नीळकंठ पाटील यांनी पालखीचे पूजन केल्यानंतर हा पालखी सोहळा ७०० वारकऱ्यांसह मार्गस्थ झाला. ही वारी नागझरी येथे संत गोमाजी महाराज संस्थानात पोहोचली.गुरुवारी अकोल्यात मुक्काम असेल.

बातम्या आणखी आहेत...