आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दुसऱ्यांदा थेट सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीतील लढतीचे चित्र बुधवारी ७ डिसेंबरला स्पष्ट झाले. एकूण २,३४० जागांसाठी ४,८५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सरपंचपदाच्या २६६ जागांसाठी ९४०, तर सदस्यांच्या २०७४ जागांकरता ३,९१७ उमेदवारांचा समावेश आहे. अनेक िठकाणी बहुरंगी लढत हाेणार असून, वंचित बहुजन आघाडीने प्रथमच १४० िठकाणी सरपंचपदाचे उमेदवार जाहीर केल्याने निवडणूक रंगतदार हाेणार आहे. मात्र सध्या भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सरपंच पदासाठी ‘वंचित’प्रमाणे भूमिका जाहीर केलेली नाही.
ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदांसाठी प्राप्त अर्जांची छाननी सोमवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. त्यानंतर बुधवारी उमेदवारी अर्ज दुपारी ३ पर्यंत मागे घेता आले. दुपारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात करण्यात आले. मतदान १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत करता येणार असून, मतमोजणी २० डिसेंबर राेजी हाेणार आहे.
सदस्यांचे अर्ज मागे
जिल्ह्यातील २६६ सरपंच पदासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यात छाननीअंती १हजार ३१८ उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते. त्यापैकी ३७१ जणांनी रिंगणातून माघार घेतली.
ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जिल्ह्यात उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर ४ हजार ५०९ उमेदवारांचे अर्ज हाेते. त्यापैकी बुधवारी ५९१ जणांनी रिंगणातून माघार घेतली.
वंचित च्या प्रयाेगाकडे लक्ष
ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने प्रथम सरपंचपदाचे उमेदवार जाहीर केले. यात पातूर तालुक्यात १९, अकाेला-३५, अकाेट-२२, मूर्तिजापूर-१८, बाळापूर-१४, तेल्हारा-१५ आणि बार्शीटकाळी तालुक्यात १७ जणांचा समावेश आहेे.
पं.स., जि.प.सह ग्रामीण भागातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था ‘वंचित’च्या ताब्यात आहेत. एकिकडे सरपंच पदावर आपलाच माणूस असल्यास याचा राजकीय फायदा आगामी निवडणुकांमध्ये हाेईल, अशी आशा नेत्यांना आहे, तर दुसरीकडे जि.प.तील सत्तेचा फायदा िनधी, िवकास कामांसाठी हाेईल, असे उमेदवारांना वाटते. त्यामुळे ‘वंचित’च्या या प्रयाेगाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय घमासान हाेण्याची चिन्हे
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय घमासान हाेणार असल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरील सत्तेवर आणि सत्तेसाठी आॅक्टाेबरमध्ये घडलेल्या घडामाेडींवर नजर टाकल्यास िदसून येते. उर्वरित अडीच वर्षांसाठी आॅक्टाेबरमध्ये िनवडणुकीची प्रक्रिया झाली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.