आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे उद्या उद्घाटन:निमंत्रितांचे कविसंमेलन रंगणार; साहित्यिकांची जमणार मांदियाळी

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवकांमध्ये साहित्याची गोडी विकसित व्हावी व तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाद्वारा आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा शनिवार (5 नोव्हेंबरला) आयोजित केला आहे. सकाळी 10.30 वाजता स्व.बाजीराव पाटील साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल, वाशिम रोड येथे होणार आहे.

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत तर नाशिक येथील युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त अमरावती आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप पांढरपट्टे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर व स्वागताध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे असणार आहेत.

सकाळी 9.30 वाजता राष्ट्रगौरव दिंडी निघणार असून साहित्य दालन, कवीकट्टा, गझलकट्टा, वऱ्हाडीकट्टा व प्रकाशन मंचाचे उद्घाटन आ. वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते होणार असून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि मान्यवर अतिथींचा सहभाग असणार आहे. साहित्याच्या आस्वादासाठी वाचन अभिवृद्धी होणे गरजे असते.

प्रथम दिवसाच्या प्रमुख कार्यक्रमात 'युवा पिढी सध्या काय वाचतेय?' या परिसंवादाचे आयोजन दुपारी 1 वाजता करण्यात आले आहे. त्यांनतर निमिंत्रितांचे काव्यसंमेलन रंगणार असून विदर्भासह महाराष्ट्रातून आलेले निमंत्रित कवी त्यांचे काव्य सादर करणार आहेत. या साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, समन्वयक सीमा शेटे व विदर्भ साहित्य संघ आणि सहयोगी संस्थांद्वारा करण्यात आले आहे.

युवा साहित्य संमेलनाच्या विविध आकर्षणामध्ये प्रेमपत्रांचा स्टॉल देखील तरुणाईसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. कारंजा लाड येथील शिक्षक गोपाल खाडे यांना विविध वस्तु संग्रहित करण्याचा छंद असून त्यांनी विविध वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक इत्यादीमध्ये प्रकाशित प्रेमपत्रांचे संकलन केले आहे. त्यांनी जमविलेल्या प्रेमपत्रांचे प्रदर्शन संमेलनाच्या दोन्ही दिवशी आकर्षणाचे एक केंद्र राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...