आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे जीवन हे गंगाजलासारखे स्वच्छ, शुद्ध , निर्मळ व पवित्र आहे. ते सूर्यासारखे तेजस्वी, स्वयंप्रकाशीत आहे. त्यांच्या या तपस्पी जीवनाचा अभ्यास केल्यास वाचकाच्या अंतरंगातला अंधार व अज्ञान दूर होत पुरुषार्थ जागवण्याचे सामर्थ्य मिळते, संत हेच खरे मायबाप आहेत. त्याची सेवा करा,’ असा उपदेश मोहन रेळे यांनी केले.
श्री क्षेत्र कालवाडी येथील संत तुकाराम बीज सोहळ्यात गाथा प्रवचनाचे दुसरे पुष्प गुंफताना मोहन महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले, गाथा अभंग हे जीवनाला चंदनासारखे सुगंधीत करतात. कालवाडी सारख्या छोट्याशा गावात त्याचा सुगंध दरवळत आहे. हे या गावाचे परम् भाग्य आहे. ही संतकृपा आहे. गुरुवर्य वासुदेव महाराजांच्या कृपेने तुकोबांचे देहू या ठिकाणी अवतरले . हे कार्य पंजाबराव हिंगणकर यांच्या हातून करुन घेतले. म्हणूनच ते गुरुकृपेचे धनी ठरले.
श्रद्धासागर व कालवाडी तिर्थस्थळांचे निर्माण हीच त्यांच्या जीवनाची पुर्णाहूती आहे, असे उद्गार मोहन महाराजांनी काढले. फाल्गुन वद्य एकादशीला भाऊंचे पुण्यस्मरण झाल्याशिवाय राहत नाही, असे सांगून त्यांच्या कार्यस्मृतींना उजाळा दिला. वै. पंजाबराव हिंगणकर यांचे कालवाडी ग्रामस्थांनी पुण्यस्मरण केले. रात्री गुरुवर्य गोपाळ महाराज उरळकर यांचे हरिकीर्तन झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.