आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम विदर्भातील विविध भागात खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात ज्या भागात जमिनीची ओल आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. दरम्यान येत्या 25 जूनपर्यंत विदर्भात विविध ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
श्री शिवाजी महाविद्यालय अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार मान्सुन विदर्भातील बऱ्याच ठिकाणी पोहोचला असून पुढील दोन दिवसात तो विदर्भातील उर्वरित भागात पोहचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भातील विविध भागात पावसाची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे हवेच्या वरच्या थरात वाहणारे वारे आणि अरबी समुद्रातून हवेच्या खालच्या थरात वाहणारे वारे यांच्या प्रभावामुळे विदर्भात 19 तारखेला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तारखेनुसार पावसाचा अंदाज
19 जून : अमरावती,. अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात पाऊस होईल.
20 जून : चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात काही ठिकाणी विखुरलेला पाऊस होईल.
21 जून : विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
22 जून : विदर्भातील सर्वच जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
23 ते 25 जून : विदर्भात विखुरलेला ते बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.