आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च शिक्षण:उच्च शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर प्राध्यापक मेळाव्यात केले मंथन

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचा मेळावा व भविष्यवेधी सिंहावलोकन कार्यक्रम लरातो वाणिज्य महाविद्यालयात उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने आयोजित या प्राध्यापक मेळाव्यात अनेक मान्यवर तसेच जिल्ह्यातील प्राध्यापक उपस्थित होते

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू तथा उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. के. राम कुलकर्णी हाेते. उद्घाटक अॅड. मोतीसिंह मोहता तर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे पदाधिकारी प्रा. प्रदीप खेडकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोपाल खंडेलवाल, ओम प्रकाश दाळू, प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके प्रामुख्याने उपस्थित होते.

कायक्रमाला उपस्थित मान्यवरांनी , प्राध्यापक आणि संस्थाचालक यांच्या विविध प्रश्नांवर प्रकाशझाेत टाकून उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांचा उहापोह केला. भविष्यवेधी सिंहावलोकन करत असताना शिक्षण मंचाच्या भूतकाळाची आठवण करून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन वाटचाल करण्यावर मान्यवरांनी भर दिला.

उद्‌घाटन सत्राचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि संत गाडगे बाबा व सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. अनुप शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डाॅ. नाना भडके यांनी केले, तर डॉ. श्रीकृष्ण काकडे यांनी आभार मानले.

असे झाले दुसरे सत्र : दुसऱ्या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नंदकिशोर ठाकरे होते. त्यांनी भाषणात विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्य यांच्या समस्येवर शिक्षण मंचाद्वारे मार्ग काढल्याचे सांगितले. या वेळी डॉ. सुनील आखरे यांनी शिक्षण मंचाच्या कार्याचा व संघर्षाचा आढावा घेतला. डॉ. दिनेशकुमार मतांगे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीत शिक्षण मंचाचे योगदान अधोरेखित केले. डॉ. प्रफुल्ल गवई यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांच्या विविध समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. डॉ. ममता इंगोले यांनी महिला प्राध्यापकांचे प्रश्न मांडून महिला सक्षमीकरणावर भर दिला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जयंत बोबडे, प्राचार्य डॉ. विजय नानोटी, प्रा. मधुकर पवार यांनीही आपले मत मांडले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. विद्या धुर्व यांनी केले. आभार डॉ. सुवर्णा डाखोरे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...