आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गट:अकोल्यातील महिला बचत गटाची उत्पादने प्रवाशांमार्फत जाणार देशभर

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या ‘वन स्टेशन वन शॉप’ या उपक्रमांतर्गत अकोला रेल्वे स्टेशन येथे महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्टॉल आजपासून कार्यान्वित झाला. अकोला रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांमार्फत महिला बचत गटांची उत्पादने देशभर जाण्याची संधी निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आज या स्टॉलचे उद्घाटन झाले.

अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर हा स्टॉल लावण्यात आला आहे. सूर्योदय महिला बचत गटाला हा स्टॉल मिळाला असून महिला बचत गटाने उत्पादित केलेली विविध उत्पादने या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. अकोला रेल्वेस्थानकचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक मोहम्मद यामीन अन्सारी, स्टेशन प्रबंधक ए. एस. नांदुरकर, रेल्वे पोलिस बल निरीक्षक युनूस खान, रेल्वे पोलिस स्टेशन प्रभारी अर्चना गाडवे, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहायक संचालक रोजगार व स्वयंरोजगार तथा कौशल्य विकास द. ल. ठाकरे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या, की ‘प्रवाशांना प्रवासात सोईचा होईल असा अल्पोपाहार वा अन्य खाद्यपदार्थ उत्तम पॅकिंग करून उपलब्ध करून द्यावे. प्रवाशांच्या गरजेप्रमाणे त्यांना ते उपलब्ध होतील व स्टॉलवर होणारी विक्री वाढेल. तसेच अकोला जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य असणारे उत्पादने ही विक्रीसाठी ठेवावी जेणेकरून अकोला जिल्ह्यातील उत्पादने ही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. या वेळी सूर्योदय महिला बचत गटाच्या दीपिका देशमुख, सिंधू वानखडे, वैशाली देशमुख, पूनम पिसे आदी महिला सदस्य उपस्थित होत्या. स्टॉलला लगेचच प्रवासी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला व स्टॉलवरील विविध वस्तू बघण्यासाठी व खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...