आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:घाण पाण्याच्या डबक्यामुळे महसूल कॉलनी रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

मूर्तिजापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ आणि महसूल कॉलनीच्या दरम्यान असलेल्या घाण पाण्याच्या डबक्यामुळे या भागातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काहींना तर आपला दरवाजा देखील उघडणे मुश्कील झाले आहे.

याबाबत अनेकवेळा निवेदने देऊन देखील दुर्लक्ष केल्या जात आहे. लहान-सहन बाबींकडे, त्याचप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदने देणे किंवा आंदोलन करणे हेच पर्याय शिल्लक राहिले आहेत काय ? असा प्रश्न या भागातील रहिवासी उपस्थित करीत आहे. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य आणि संबंधित विभाग स्वतःहून का दखल घेत नाही? हा देखील संशोधनाचा विषय आहे. तसेच संबंधित यंत्रणा काय करते असा रास्त सवाल उपस्थित केल्या जात आहे.हा भाग हातगाव ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्र.४ मध्ये येतो. त्यामुळे तेलगोटे यांच्या घरापासून तर गावंडे यांच्या घरापर्यंत नाली जोडण्यात यावी याबाबत या भागातील रहिवाशांनी बऱ्याच वेळा निवेदने दिली आहेत. तरी देखील अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.

पावसाळ्याच्या दिवसात येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. या डबक्यामध्ये डुकरे, कुत्रे यांचा वावर राहत असल्याने आणि घाण जमा होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून मच्छर, अळ्या निर्माण होत आहेत. तरी लवकरात लवकर सदर बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी या भागातील रहिवासी विलास तेलगोटे, गोपाल सदार, उदय शिंदे, रमेश पोहोकार, सुरेश घाटे, हरीनारायण पाटील, हनुमान प्रसाद तिवारी, धनुकुमार मोहोड, देविदास घाटे, मधुकर हिरुळकर, सुनील इंगळे, अतुल देशमुख, राहुल गडेकर, अनिल मानके, प्रसाद कथलकर, मोहन खोब्रागडे, स्वप्नील मुळे, दिनेश मुंडे आदींच्या वतीने करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...