आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते वाहतुक बळींचा जागतिक स्मृती दिन:वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश देत निघाली रॅली; रस्ता सुरक्षाअंतर्गत राबवला उपक्रम

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ता वाहतूक सुरक्षाअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखेकडून रविवारी रॅली काढण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन करा, असा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. रस्ते वाहतूक बळींचा जागतिक स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थीनी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.

रस्ता वाहतूक सुरक्षाअंतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली रॅली काढून सूचना पत्रांचे वितरण करण्यात आले. अपघात होवू नयेत, प्राण हानी, अपंगत्व येवू नये, आर्थिक नुकसान होवू नये, यासाठी वाहतुक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. वाहन हळू चालविणे, मद्यपान करून वाहन चालवू नये याबाबत चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तुकाराम चौक ते आरटीओ कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.

कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुताेंडे-वसे, वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक मोटर वाहन निरीक्षक मनोज शेळके यांनी केले. प्रास्तविक मोटर वाहन निरीक्षक हेमंत खराबे यांनी, तर आभार सहायक मोटर वाहन निरिक्षक लेनिन ढाले मानले. रस्ते अपघातात बळी ठरलेल्या कुटुंबातील सदस्य भीमराव जाधव व प्रमोद इंगळे यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

रस्ता वाहतूक अपघातात बळी ठरलेल्या नागरिकांसाठी स्मृतीप्रित्यर्थ आठवण म्हणून रॅली काढण्यात आली. रॅलीत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, एनसीसीचे छात्र, कृषी महािवद्यालय, एलआरटी कॉलेज, आरएलटी कॉलेज, सीताबाई आर्ट्स कॉलेज ,श्री शिवाजी कॉलेज ,माउंट कार्मेल स्कूल, खंडेलवाल स्कूल ,श्रीमती देवकाबाई देशमुख प्राथमिक विद्यालय ,स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी , अस्तित्व फाऊंडेशन , प्रभात किड्स स्कूल बस चालक ,एसटीचे चालक, वाहतूक पाेिलस , मोटर ड्रायव्हिंग स्कूल, ऑटो डिलर्स,पीयूसी संचालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिाऱ्यांना 400 नागरिक सहभागी झाले.

अपघातात बळी पडलेल्या मुलाचे वडील राजेंद्र देशमुख यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्याच हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला. या रॅलीचा समाराेप काैलखेड भागातील आरटीओ कार्यालय परिसरात झाला. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जिल्हा अपघात मुक्त हाेण्यासाठी शपथ देण्यात आली. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या बाल कलावंतांनी "तू तुझा रक्षक’, हे पथना‌ट्य सादर करून नियम पाळणे आवश्यक आहे, असा संदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...