आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य विभागात होत असलेल्या पदभरती प्रक्रियेची चौकशी होणार असून, याबाबत लवकरच बैठक घ्या असा आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गत कडून होत असलेल्या भरती चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार डॉ. आमदार रणजित पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केली होती. यावर पालकमंत्री कडू यांनी बैठक घेण्याचा आदेश दिला. हे प्रकरण बाह्य स्त्रोतामार्फत स्त्री रुग्णालयात कंत्राटी पदभरतीचे असून, याबाबत रुग्ण कल्याण समितीचे पराग गवई यांनी तक्रार केली होती.
दरम्यान डिपीसीच्या सभेत डॉ. पाटील यांनी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमविर जिल्ह्यात स्थापण्यात आलेले ऑक्सजिन प्लांट सुरु असल्याबाबत एक चाचणी घेण्यात यावी, अशीही मागणी केली. पूर्णा नदीत अमरावती जिल्ह्यातील सांडपाणी व उद्योगाचे सांडपाणी येऊन निर्माण झालेल्या जलप्रदूषणाच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.
नैसर्गिक आपत्तीवर चर्चा : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात नालेसफाई, पुल दुरुस्ती याबाबत पावसाळा सुरु होण्याच्या आत उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी डिपीसीच्या सभेत केली. गत वर्षी अतविृष्टीत बाधीत झालेल्या कुटुंबांना मदत निधी मिळण्याबाबत उपाययोजना व्हावी अशी मागणी आ. गाेवर्धन शर्मा यांनी केली.
गतवर्षीच्या पूरग्रस्तांना मिळणारी मदत, पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी आ. सावरकर यांनी केली. पावसाच्या दृष्टीने करावयाची पूर्व तयारी करा, असे आमदार नितीन देशमुख म्हणाले. जिल्हयात १०८ रुग्णवाहिकांची सेवा मिळण्यात रुग्णांना होत असलेला त्रास, तसेच जिल्ह्यात अग्निशमन सेवांबाबत आ. हरिष िपंपळे यांनी प्रश्न उपस्थित केले.
सुपरस्पेशालिटी रुग्णालया संदर्भात बैठक : सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यासंदर्भात (११ किंवा १२ जूनला)मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे बैठक होऊन त्यात निर्णय होईल, असे पालकमंत्री कडू म्हणाले. ग्रामिण भागात अग्निशमन सुविधा उपलब्धतेसाठी बाजार समित्यांना अग्निशमन बंब उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. पूर्णा नदीत अमरावती जिल्ह्यातून येणाऱ्या प्रदूषित पाण्यासंदर्भात अमरावती येथे बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले.
खतांची साठेबाजी रोखा
खतांची साठेबाजी रोखण्यासाठी उपाययोजना व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी कांॅग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती. पिककर्जाची शेतकऱ्यांना उपलब्धता करुन देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले होते. खतांचे आवंटन प्राप्त होण्यासाठी रेल्वेस्थानकावर खतसाठा तात्काळ वाहतूक होणे व तेथे तोवर पावसात तो सुरक्षित राहणे, याबाबत भूमिका आ. रणधीर सावरकर यांनी मांडली.
पाणी टंचाईवर आमदारांचे प्रश्न
जिल्ह्यात असलेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना कराव्या अशी मागणी,अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये केली होती. जिल्ह्यातील पाणी टंचाई कृती आराखड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून अनेकदा बदल सूचवण्यात आले होते. तसेच आराखड्यातील निधीही कमी करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.