आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्ती:उड्डाणपुलावरून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पाइपची अखेर दुरुस्ती सुरू

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलावरून धबधबे जमिनीवर काेसळणे बंद हाेण्यासाठी रविवारी प्रयत्न सुरू करण्यात आले असून, नवीन व व्यवस्थित पाइप लावण्यास प्रारंभ झाला. उड्डाणपुलाचे पाणी वाहून नेणारे पाइप व्यवस्थित न बसवल्याने काेसळणारे हे पाणी अंगावर पडू नये, यासाठी वाहन चालक ते चुकवण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात अपघात हाेण्याचीही भीती असते. प्राधिकरणाच्या या बेताल कारभाराचा दै. दिव्य मराठीने ग्राउंड रिपाेर्ट केला हाेता. त्यानंतर जाग असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपाय याेजनांना प्रारंभ केला आहे.

अकाेल्यात निमवाडी ते नेहरु पार्कनजीक आणि मध्यवर्ती कारागृहापासून ते अग्रसेन चाैकापर्यंत अशा दाेन उड्डाणपुलांचे लाेकार्पण २८ मे राेजी करण्यात आले. उड्डाणपुलावरील पाण्याचा याेग्य पद्धतीने िनचरा हाेण्यासाठी पाइप लावले. मात्र पाणी वाहून नेणारे पाइप अनेक ठिकाणी व्यवस्थित न लावल्यामुळे पाणी थेट पुलाखालून जाणाऱ्या वाहनांवर पडत हाेते.

बातम्या आणखी आहेत...