आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापती:जिल्हा परिषद सभापती निवडणुकीचा निकाल आज जाहीर हाेणार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदाच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी ५ नाेव्हेंबरला जाहीर हाेणार आहे. यासाठी सकाळी ११ वाजता सभा हाेणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील याचिका निकाली निघाल्यानंतर निकाल घाेषित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला हाेता. जिल्हा परिषदेच्या दाेन विषय समिती, समाज कल्याण आिण महिला व बाल कल्याण समिती या चार सभापतींची मुदत ३० ऑक्टाेबरला संपुष्टात आली हाेती. त्यामुळे २९ ऑक्टाेबर राेजी नवीन सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया झाली हाेती.

मतदान व मतमाेजणीही झाली हाेती. मात्र शिवसेनेच्या एका सदस्येची निवड रद्द केल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली हाेती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी निकाल जाहीर करण्यावर न्यायालयाने स्थगिती दिली हाेती. मात्र मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर निकाल जाहीर करण्यास न्यायालयाने परवानगी दिली हाेती. त्यानुसार शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात निकाल घाेषित हाेणार असून, यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून अकाेला उपविभागीय अधिकारी कामकाज पाहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...