आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध:त्या युवकाचा शोध सुरू; कुरणखेड येथे जेसीबीत झोपलेला युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला

कुरणखेड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यात गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. दरम्यान कुरणखेड येथील काटेपूर्णा नदीच्या परिसरातील एका मोठ्या नाल्याच्या साइटवर राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील बिहारचा एक युवक वाहून गेला. रात्री जेसीबीमध्ये ताे झोपलेला होता. या वेळी मध्यरात्री नाल्यातून आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात जेसीबी उलटला. त्यातच ताे वाहून गेला. सुदैवाने या अपघातात सोबतचे तीन मजूर आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले.

अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अकोला तालुक्यातील कुरणखेड येथील काटेपूर्णा नदीजवळ एक मोठा नाला आहे. येथे दोन दिवसांपासून जेसीबीद्वारे माती उपसण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी दिवसभर दोन जेसीबीद्वारे काम करण्यात आले. रात्री काम झाल्यानंतर हे कार्यरत चार मजूर जेसीबींमध्येच झोपले. एका जेसीबीमध्ये दोन मजूर होते. रात्री पावसाचा जोर वाढला. नाल्याचा पाण्याचा ओढा जेसीबीपर्यंत पोहाेचला. मशीन हळूहळू पाण्यामध्ये जात असल्याचा भास एकाला झाला. त्याने आपल्या जेसीबीमध्ये असलेल्या व्यक्तीला उठवून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या जेसीबीमध्ये झोपलेल्या मजूरांना उठवण्याचा प्रयत्न केला. यातील एकाला कसेतरी बाहेर काढण्यात यश आले. पण दुसरा प्रचंड झोपेत होता, त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना जेसीबी उलटला. त्यामुळे यामध्ये सचिनकुमार ओमप्रकाश प्रसाद नामक युवक वाहून गेला.

दोन पथक, चार जेसीबीद्वारे शोधकार्य सुरू : घटनेमधील चारही व्यक्ती बिहार येथील आहेत. तिघांनी झालेला प्रकार तत्काळ मालकाच्या कानावर घातला. मात्र, रात्री पावसाच्या जोर अधिक असल्यामुळे शोधकार्य हाती घेता आले नाही. सकाळी कुरणखेड येथील माँ चंडिका माता आपत्कालीन पथकाचे प्रमुख रंजित घोगरे, शहाबाज शहा, राम उमाळे, वीरेंद्र देशमुख, संतोष गोगटे, उर्वरित. पान ४ कुरणखेड येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर असलेला बिहारचा एक युवक रात्री जेसीबीमध्ये झाेपलेला असताना नाल्याच्या पुरात वाहून गेला

बातम्या आणखी आहेत...