आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी सोसायटी:दानापूर येथील सेवा सहकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलने मिळवले वर्चस्व ; शेतकरी एकता पँनलचा पराभव

दानापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दानापूर सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन त्यात जि.प. चे माजी उपाध्यक्ष सुभाष रौदळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे १२ पैकी १२ उमेदवार विजयी झाले. यात शेतकरी एकता पँनलचा पराभव झाला. शेतकरी विकास पँनलच्या विजयी उमेदवारांत संजय खोडे, पुंडलिक घायल, बाळकृष्ण डाबेराव, पंजाब दांदळे, श्याम भालेराव, कैलास रौदळे, प्रकाश विखे, सुरेश हागे, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून हिम्मत वाकोडे, महिला प्रतिनिधी मतदार संघातून छाया गौर, कमला ढगे इतर मागासवर्गीय मतदार संघातून रवींद्र नाठे, भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून देवलाल अघडते हे बिनविरोध झाले. या वेळी ठाणेदार चव्हाण, पीएसआय बालोद, बीट जमादार गवळी, चंद्रकांत सोळंके, आशिष साबळे, स्नेहा फाटे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला. निवडणूक अधिकारी म्हणून खाडे यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांची गावात मिरवणूक काढली. जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुभाष रौदळे, पं. स. सदस्य संदीप पालिवाल, उपसरपंच सागर ढगे, ग्रा. पं. सदस्य गोपाल विखे, ग्रा. पं. सदस्य रवींद्र तायडे, माजी सरपंच अशोक नाठे, भोजराज पालिवाल, डॉ. रामराव मिसाळ, डॉ. खोडे, गोपाल तळोकार, रामदास हागे, गणेश नांदुरकार, गंगाधर झगडे, विजय अढाऊ, विनोद तायडे, गोपाल बोरशे, अतुल भोंगळ, दिलीप विखे, बाळू नाठे, बाजिराव विखे, संतोष हागे, प्रमोद वाकोडे, त.मु.अध्यक्ष तेजराव वाकोडे, रवींद्र दांदळे, प्रल्हाद हागे, दीपक भालेराव, योगेश नाठे उपस्थित होते. सोसायटीच्या निवडणुकीतील विजयानंतर शेतकरी विकास पँनलने जल्लोष केला.

बातम्या आणखी आहेत...