आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरउर्जा प्रकल्पाची रखडपट्टी:खर्चाबाबत पालिकेने सहमती पत्र दिल्यास 2 महिन्यांत प्रकल्प सुरू, विभागीय महाव्यवस्थापकांची माहिती

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महान जलशुद्धीकरण केंद्र आणि शिलोडा मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प रोहित्रातील दुरुस्ती खर्चास महापालिकेने सहमती पत्र दिल्यानंतर दोन महिन्यांत कार्यान्वित होईल, अशी माहिती मेडाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी दिली.

महापालिकेमुळे काम रखडले

सौर ऊर्जा प्रकल्पाचा डीपीआर (महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण) मेडा​​​मार्फत शासनाकडे पाठण्यात आला होता. १४०० किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यापैकी ९९० केव्ही क्षमतेचा प्रकल्प महान येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तर उर्वरित प्रकल्प शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरात उभारण्यात आला. मेडाने हे काम भेल कंपनीला दिले होते. दोन्ही सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. केवळ नेट मिटरींगमुळे या प्रकल्पाचे कार्यान्वयन रखडले आहे. यामुळे महापालिकेचे महिन्याकाठी लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान होत आहे. या अनुषंगाने प्रफुल्ल तायडे यांना विचारले असता ते म्हणाले, नेट मिटरींगपर्यंतची कामे आटोपली आहेत. केवळ रोहित्रात काही बदल करावे लागणार आहे. यासाठी ७३ लाख रुपये खर्च आहे. हे काम मनपाने करणे गरजेचे होते. मात्र हे काम त्यांनी मेडावर सोपवले आहे. यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ३२ लाख ९० हजाराचा निधी त्यांनी दिलेला आहे. उर्वरित खर्च देण्याचे सहमती पत्र महापालिकेने दिल्यानंतर दोन महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

इनसाईड स्टोरी

महान आणि शिलोडा येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम मेडाकडे सोपविण्यात आले होते. नेट मिटरींगपर्यंत काम करण्याची जबाबदारी मेडाची होती. मात्र, नेट मिटरींगदरम्यान रोहित्रामध्ये दुरुस्तीची कामे करण्याची जबाबदारी ही महापालिकेची होती. नेट मिटरींगपर्यंतचे काम होवून सात महिन्याचा कालावधी झाला. या दरम्यान हे काम कोण करणार? याबाबतच बहुधा पत्र व्यवहार झाला. अखेर ही जबाबदारी मेडाने स्विकारली. यासाठी ५२ लाख रुपयाचा खर्च अपेक्षित होता. मात्र हे दर २०१९-२०२० चे होते. त्यामुळे साहित्याच्या किमती वाढल्या. आता हा खर्च ७३ लाख रुपये झाला आहे. महापालिकेने यापैकी ३२ लाख ९० हजार रुपये वळते केले आहेत. उर्वरित रकमेचा भरणाही मनपाला करावा लागणार आहे. यासाठी मेडाला महापालिकेचे सहमती पत्र हवे आहे. या सहमतीबाबतचे पत्र मेडाने ५ ऑगस्ट रोजी महापालिकेकडे रवाना केले. आता हे पत्र महापालिकेकडे पोहोचल्यावर सहमती पत्र देण्यास किती दिवस लागणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...