आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कारवाई करीत पथक पुढे गेले; मागे अतिक्रमणांचे पुन्हा बस्तान बसले

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्य मार्गावर अतिक्रमण हटाव पथक अतिक्रमण काढून पुढे जात होते तर अतिक्रमण हटाव पथक पुढे गेल्यावर आपली दुकाने थाटत होते, असे चित्र अतिक्रमण हटाव मोहिमेत मंगळवारी दुसऱ्या दिवशी दिसून आले. परिणामी ही मोहीम राबवून मनपा प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे. दरम्यान मोहीमेदरम्यान पथकाला पोलिस संरक्षण मिळाले नसल्याने एखादवेळी अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण? अशी चर्चाही सुरू आहे.

मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनंतर महापालिकेने सोमवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. सोमवारी गांधी चौक ते टिळक मार्ग-अकोट फैल पोलिस ठाणे पर्यंत अतिक्रमण हाटव मोहीम राबवण्यात आली. तर मंगळवारी २२ नोव्हेंबरला खुले नाट्यगृह ते फतेह चौक-मालधक्का चौक या मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. या मार्गावरील जनता भाजी बाजार गल्लीतील किरकोळ भाजी विक्रेत्यांचे ओटे, दुकानांचे ओटे तोडले. तर मोहीम सुरू झाल्यानंतर चारचाकी गाडीवरील फळ विक्रेते, चहाची टपरी आदींनी

यापूर्वीही अनेक वेळा मनपाने राबवली मोहीम
महापालिका अस्तित्वात आल्यानंतर अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. २००६-२००७ या वर्षात तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे, २०१०-२०११ या वर्षात डॉ.विपिन शर्मा, २०१४-२०१५ या वर्षात डॉ.महेंद्र कल्याणकर, २०१८-२०१९ या वर्षात संजय कापडणीस, २०२०-२०२१ या वर्षात नीमा अरोरा या आयुक्तांनी अतिक्रमण हटाव मोहिम राबवल्या. मात्र मोहिमेनंतर पुन्हा अतिक्रमण जैसे-थे झाले.

कशामुळे होते अतिक्रमण?
जनता भाजी बाजारात विक्रेत्यांसाठी ओटे निश्चित केलेे आहेत. मात्र निश्चित ओट्यांपेक्षा भाजी विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. लोकसंख्या वाढल्याने ग्राहकही वाढले. त्यामुळे भाजी विक्रेते जागा मिळेल तेथे दुकान थाटतात. तर फ्रूट मार्केटचीही तीच गत आहे. त्यामुळे अनेक किरकोळ फळ विक्रेते दुकाने रस्त्यावर थाटतात. प्रशासनाने हॉकर्स झोन, नो-हॉकर्स झोन निश्चित केले नसल्याने अतिक्रमण होत आहे.
------

बातम्या आणखी आहेत...