आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा दिलासा:परिचारिकांचे राज्यस्तर बेमुदत आंदोलन तूर्तास पुढे ढकलले ; रूग्णालयातील कामकाज येणार पूर्वपदावर

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील वैद्यकीय शिक्षण व आयुर्वेद महाविद्यालये आणि रूग्णालयांमधील परिचारिकांचे मागण्यांसाठीचे आंदोलन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. यामुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळला आहे. बुधवारी सायंकाळी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून याबाबत घोषणा केली.परिचारिकांना रूग्णालयांमध्ये सेवा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी परिचारिकांकडून २३, २४ आणि २५ मे रोजी मुंबई येथील आझाद मैदानासह सर्व जिल्ह्यातील रूग्णालयामध्ये १ तास काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. तसेच २६ आणि २७ मे रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आले. याशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघनेने दिला होता. अकोल्यातही गुरुवार २६ मे पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली होती. दरम्यान संघटना सदस्यांची ३१ जून रोजी राज्याचे वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी अमित देशमुख यांनी १५ जुलैपर्यंत परिचारीकांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे लिखित आश्वास दिले. त्यामुळे तुर्तास हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने जाहीर केला आहे. अन्यथा पुन्हा आंदोलन ः लेखी आश्वासनानुसार, पुढील ४५ दिवसांत मागण्या प्रत्यक्ष पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन पुकारू, असा इशारा राज्य परिचारिका संघटनेतर्फे देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...