आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकुंभाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा 20 दिवसात अहवाल सादर करणार:अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पथकाने केली तपासणी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धोकादायक ठरलेल्या तीन जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट(संरचनात्मक स्थर्ये तपासणी) शुक्रवारी (2 डिसेंबरला) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावतीच्या पथकाने पूर्ण केली. याबाबतचा अहवाल 15 ते 20 दिवसात महापालिकेला सादर केला जाणार आहे. या अहवालानुसार महापालिकेला पुढील कार्यवाही करावी लागेल.

शहरात 1977 साली नविन बसस्थानका मागील दोन आणि जुने शहरातील शिवनगर भागात जलकुंभ बांधण्यात आले होते. 2006 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजना महापालिकेने स्वत:च्या ताब्यात घेतली. हस्तांतरणाच्या वेळी मजिप्राने हे तीन जलकुंभ क्षतीग्रस्त झाल्याची माहिती दिली होती. मात्र महापालिकेने या जलकुंभाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले.

या अनुषंगाने 27 ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्या नंतर प्रशासनाने जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय अमरावती यांच्याकडून 2 डिसेंबर रोजी करुन घेतले. हे स्ट्रक्चरल ऑडीट शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अपलाईल्ड मॅकेनिक्स (उपयोजिता यंत्र शास्त्र विभाग) चे असोसिएट प्रोफेसर बी.एस.लांडे, आर.आर.अकर्ते, राहुल डुलगज यांनी केले.

यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे, कनिष्ठ अभियंता शेैलेष चोपडे, नरेंद्र बावने, तुषार टिकाईत,रामेश्वर दोड, व्हॉल्वमन सुधीर ढुके, गणेश घोडके, धनराज पातोंडे, नागनाथ मोरे, संतोष पाचपोर, संतोष बडवे, धनराज संदाशिव उपस्थित होते.

असे केले जाते काम

स्ट्रक्चरल ऑडीट करताना रचनेचे स्थर्ये, सुरक्षितता, वातावरणीय परिणाम याचा अभ्यास केला जातो. यात जलकुंभाचे कॉलम, फाऊंडेशन, टाकी यांची दृश्य तपासणी (थेट पाहणी) तसेच अविनाशी चाचणी (तोडफोड न करता) हॅमरने कॉक्रीटची तपासणी केली जाते. अल्ट्रोसॉनिक पल्स व्हेलासिटी (ध्वनी तरंग) कॉलमच्या एका बाजूने मशिन लावून दुसऱ्या बाजुने तो किती वेळेत पोचला, याची मोजणी केली जाते. याच बरोबर कॉलम कुठे झुकलेला आहे का? कुठे क्रॅक झालेले आहे का? आतील लोखंडी बार किती जंगलेले आहेत याबाबीही तपासल्या जातात. यंत्राद्वारे केलेली तपासणीनुसार अहवाल तयार केला जातो. यानुसार संबंधित संस्थेला कार्यवाही करावी लागते.

तुर्तास पाणी कमी भरावे लागेल

प्राथमिक पाहणीनुसार तीन जलकुंभांना दुरुस्तीची गरज आहे. मात्र पूर्ण अहवाल तयार केल्या नंतरच नेमक्या उपाय योजना सुचवल्या जातील. मात्र जलकुंभाच्या क्षमतेनुसार जलकुंभ न भरता जलकुंभात पाणी कमी भरावे लागेल? एवढी बाब निश्चित आहे.

-असोसिएट प्रोफेसर बी.एस.लांडे

बातम्या आणखी आहेत...