आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक पुलावरून खाली कोसळला:अकोला ते महान मार्गावर भीषण अपघात; सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला ते महान मार्गावर बार्शीटाकळी शहराजवळ शिवम जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी जवळ शुक्रवारी सकाळी 10 वाजता ट्रक पूलावरून खाली कोसळला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघातामध्ये सुदैवीने कुठलीच जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

कोणतीच कारवाई नाही

अकोला ते महान मार्गावर बार्शीटाकळी शहराजवळ ब्रिटिशकालीन पूल आहे. पुलाचे कठडे जीर्ण झाले आहेत. यामुळे हा पूल दुरुस्त करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. यापूर्वी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने पुलाचे बांधकाम होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. मात्र, अद्याप शासनाकडून याबाबत कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.

प्रवाशांना आहे धोका

या पुलाची दुरुस्ती अद्यापही करण्यात आलेली नाही. असेत चित्र असल्यास येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पुलाची सद्याची स्थिती बघता पावसाळ्यामध्ये नागरिकांना पुलावरून प्रवास करण्यास मोठा धोका आहे. याबाबत पूर्वीची दक्षता घेऊन पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांडून करण्यात आलेली आहे.

पुलाला कठडेही नाही

या ब्रिटिशकालिन पुलाला कठडे नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये वाहन वाहून जाण्याची शक्यता आहे. कडठे नसल्यामुळे शुक्रवारी ट्रकचा अपघात झाला. पूल अरुंद असल्यामुळे पुलाला कठडे आवश्यक आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत दक्षता घेऊन कार्यवाही करण्याची मागणी नागरिक करत आहे.

बातम्या आणखी आहेत...