आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच सेकंदात कोसळली गॅलरी:वादळी वाऱ्यामुळे अकोट सराफा बाजाराची गॅलरी कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्या जिल्हयामध्ये शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याचा प्रकोप प्रचंड होता. या वाऱ्यामुळे अकोट येथील सराफा बाजाराची गॅलरी कोसळली आहे. सायंकाळी साडेपाच च्या सुमारास ही घटना घडली. अपघातामध्ये दुदैवाने जीवितहानी झाली नाही.

अकोटमध्ये सराफा बाजारमधील बालाजी मार्केटची जुनी इमारत आहे. या भागात लोकांची प्रचंड वर्दळ असते. इमारतीच्या पुढल्या भागातील गॅलरीला पकडून उन्हापासून बाचावासाठी ग्रीननेट बांधण्यात आले होते. शनिवारीच्या जोरदार पावसामुळे हे ग्रीननेट उडत होते. यामुळे इमारतीला हादरा बसल्याचा भास येथील लोकांना होऊ लागला. इमारतीमध्ये असलेल्या लोकांचे गॅलरीकडे लक्ष गेले. यावेळी गॅलरीच्या काही टाईल्स फाकत असल्याचे निदर्शनास आले.

या धक्कादायक प्रकारामुळे काही वेळ लोकांची धावाधाव झाली. धोकादायक ठिकाणांवरून लोकांना बाहेर काढण्यात आले. काहीवेळात ही गॅलरी पुढल्या टाईल्स पकडून खाली कोसळली. घटनेमुळे कुठलिही जीवितहानी झाली नाही. मात्र, भागातील काही वाहनांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेचा हादरा आणणारा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इमारत जुनी असल्याचे अपघात

बालाजी मार्केटची इमारत अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. जुनी इमारत असल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. सुदैवाने घटनेमुळे कुठलिही जीवितहानी झालेली नाही.

अकोटात वृक्ष उन्मळून पडले

अकोट शहरात शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे यात्रा चौक परिसरातील कडू निंबाचे झाड उन्मळून पडले. तसेच बस स्थानक परिसरातील विद्यूत खांब, तारांवर वृक्षांच्या फाद्या कोसळल्या. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. शहरात अनेक ठिकाणी उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी गॅलरी, घराबाहेर ग्रीन नेट लावण्यात आल्या आहेत. मात्र आता पावसाळा सुरू झाला असून, वादळी वाराही वाहत आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...