आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्जळी:जलवाहिनी फुटल्याने शहरातील सात जलकुंभांचा पाणीपुरवठा विस्कळीत

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक वाटिका चौकात उड्डाणपुलाच्या पिल्लरखाली (लॅडिंग) असलेली ४५० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटल्याने शहरातील सात जलकुंभांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याच्या दुरुस्तीला चार ते पाच दविस लागण्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली. दरम्यान पाणी लॅडिंगमध्ये शिरल्याने लॅडिंगमधील भरावासाठी टाकलेली राख बाहेर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणपुलावरुन म्ूर्तिजापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. मात्र पुलावरील उर्वरित वाहतूक सुरू आहे.

अकोला पाणी पुरवठा योजनेचे महान येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या जलशुद्धीकरण केंद्रातून २५ एमएलडी, ६५ एमएलडी असे दोन केंद्र आहेत. २५ एमएलडी च्या केंद्रातील ४५० मिमी व्यासाची जलवाहिनी अशोक वाटिके जवळून जाते. ही जलवाहिनी उड्डाणपुलाच्या पिल्लरच्या खालून गेेली आहे. येथून नेहरु पार्क चौकातील जलकुंभातील ३५० मिमी व्यासाची जलवाहिनी गेेली आहे. ही जलवाहिनी साडेतीन महिन्यांपासून फुटलेली आहे. ही फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम शनविारी १७ डिसेंबरला सुरू केले होते. या जलवाहिनीची दुरुस्ती करताना अथवा अधिक दाबामुळे पिल्लर खालून गेलेली ४५० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे सात जलकुंभांचा पाणी पुरवठा ठप्प झाला.

जलवाहिनी फुटल्याने शहरातील सात जलकुंभांचा पाणीपुरवठा विस्कळीत नियोजनाचा अभाव : उड्डाणपुलाचे काम करताना जलवाहिनी बदलण्याचे काम करणे गरजेचे होते. महापालिकेने तसा प्रस्ताव नॅशनल हावये विभागाला दिला होता. मात्र नॅशनल हायवे विभागाने जलवाहिनी बदलण्याची गरज नसल्याचे सांगीतले कारण जलवाहिनी बदलण्याचा खर्च हा नॅशनल हायवेला करावा लागला असता. तसेच महापालिकेने ही बाब निमूटपणे मान्य केली. त्यामुळे आता जलवाहिनीचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. लॅडिंग खालून गेलेली जलवाहिनी दुरुस्त करता येत नसल्याने आता महापालिकेला ५० ते ६० मीटर जलवाहिनी बदलावी लागणार असून, यासाठी ५० ते ६० लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

सकाळी चार वाजता निदर्शनास आली बाब पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता तुषार टिकाईत हे नागपूर येथून अकोल्यात येत असताना पहाटे चार वाजता जलवाहिनी फुटल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. या वेळी व्हॉलमन राहुल डोंगरे, आशिष भालेराव हे उपस्थित होते. त्यांनी त्वरीत महान येथील जलशुद्धीकरण केंद्रात संपर्क साधून २५ एमएलडी वरील पाणी पुरवठा बंद केला. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याचा अपव्यय टळला. उड्डाणपूल पडल्याची अफवा : दरम्यान लॅडिंगमधील राख मोठ्या प्रमाणात बाहेर आल्याने उड्डाणपूल पडल्याची अफवा शहरात पसरली होती. उड्डाणपुल कसा काय पडला? हे पाहण्यासाठी अनेकांनी पुलाजवळ गर्दी केली होती.

या भागाचा पाणीपुरवठा झाला ठप्प नवीन बसस्थानकामागील दोन जलकुंभातून आंबेडकर नगर, महसुल कॉलनी, व्हीएचबी कॉलनी, महंमद अली रोड, इराणी झोपडपट्टी, हुमायू रोड परिसर, काश्मिर लॉज परिसर, लाल बंगला, मोमीनपूरा, कलाल चाळ, श्रावगी प्लॉट, भाजी बाजार, टॉवर रोड, रेल्वे क्वॉटर भाग, चविचवि बाजार, राधाकिसन प्लॅाट, अमृतवाडी परिसर, पत्रकार कॉलनी, जुने शहरातील शविनगरातील दोन जलकुंभातून बाळापूर रोड, शवि नगर, शविाजी नगर, भीम नगर, गुलजार पूरा, रेणुका नगर, गणेश नगर, इंदिरा कॉलनी, रमेश नगर, कोमटीपुरा, गोडबोले प्लॉट, वानखडे नगर, शविचरण पेठ, ज्ञानेश्वर नगर, नवाबपुरा, साई नगर, आश्रय नगरातील जलकुंभातून आश्रय नगर, कोर्ट कॉलनी, गजानन नगर, मेहरे नगर, गुरुदेव नगर तर शविणी,शविरच्या जलकुंभातून शविणी, शविर या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला.

म्ूर्तिजापूरकडे जाणारी लॅडिंगवरील वाहतूक बंद लॅडिंगखाली असलेली जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनीतील पाणी लॅडिंगमध्ये शिरले. त्यामुळे भरावासाठी टाकलेली राख पाण्यासोबत बाहेर आली. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून उड्डाणपुलावरुन म्ूर्तिजापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र जेल चौक ते रेल्वे स्थानक अशी उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...