आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकुंभ:तीन जलकुंभांचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला ; नागरिक त्रस्त

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजने अंतर्गत नव्याने बांधलेल्या तीन जलकुंभावर स्काडा ऑटोमेशन कार्यप्रणालीचे काम पूर्ण न झाल्याने या तीनही जलकुंभावरुन ज्या भागाला पाणीपुरवठा होतो, त्या भागाला आता शुक्रवार ऐवजी शनिवारी पाणीपुरवठा केला जाणार आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा सबलीकरणाची विविध कामे सुरु आहेत. यापैकी काही पूर्ण झाली आहेत. पाणीपुरवठा योजनेचे जाळे मोठे असल्याने मनुष्याकरवी सर्व कामे करणे अवघड होत आहे. तसेच योजनेवरील तांत्रिक कर्मचारी दर महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळेच कमी मनुष्यबळाचा वापर करुन पाणीपुरवठा योजनांमधील होणाऱ्या प्रक्रियेमध्ये स्वयंचलन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. स्काडा ऑटोमेशन पद्धतीमुळे पाण्याची गुणवत्ता व संयंत्रणाचे विविध प्रमाणके ऑनलाइन पाहता येणार आहे. व आवश्यकतेप्रमाणे नियंत्रण करता येणार आहे. शहरातील २१ जलकुंभावर ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. आता पर्यंत केवळ तीन जलकुंभावर हे काम झाले असून, आता लोकमान्य नगर, गंगा नगर आणि जोगळेकर प्लॉट या तीन जलकुंभावर कार्यप्रणाली बसवण्याचे काम सुरु करण्यात आले. हे काम दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी खात्री पाणी पुरवठा विभागाला होती. त्यामुळे या तीन जलकुंभावरुन ज्या भागाला पाणी पुरवठा होतो. त्या भागाला १ व २ जून रोजी पाणी पुरवठा होणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. मात्र स्कॉडा ऑटोमेशनचे काम २ जून रोजी पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आणखी एक दिवस या तीन जलकुंभाचा पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना होणाऱ्या त्रासा बद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

शहरात या भागाचा पाणीपुरवठा ठप्प लोकमान्य नगर भागातील जलकुंभावरील शिवसेना वसाहत, तथागत नगर, साई नगर, अनंत नगर, गुरुदेव नगर, गंगा नगर जलकुंभावरील गीता नगर, राहत नगर, पोलिस वसाहत, आकोली, स्नेह नगर, जोगळेकर प्लॉट भागातील जलकुंभावरील साई नगर, फडके नगर, सावजी स्कूल परिसर या भागाला आता ४ जून रोजी पाणीपुरवठा केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...