आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- अकोट मार्गावरील पुर्णा नदीवरील गोपालखेड गावाजवळील पुलाच्या पोच मार्गाच्या कामासाठी जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना संमतीपत्र सादर करण्यात आले.
आमदार रणधीर सावरकर यांनी जमीन संपादन करण्यासाठी शेतकरी शिष्टमंडळ व जिल्हाधिकारी यांच्यासोबत आवश्यक समन्वयासाठी बैठक घेतली होती. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक भुमिकेकेला यश मिळाल्याने पोच मार्ग बांधकामाचा मार्ग सुकर झाला आहे.
सामान्य नागरीक, विद्यार्थी, रूग्ण तसेच शैक्षणिक सुविधा आणी बाजारपेठेत जाणारे शेतकरी यांच्या समस्या लक्षात घेवून मौजे गोपालखेड येथील शेतकऱ्यांनी अकोला -अकोट मार्गावरील गोपालखेड येथील पुलाच्या पोच रस्त्याच्या बांधकामासाठी कराव्या लागणा-या भुसंपादनासाठी सामाजिक संवेदना व मानवीय दृष्टीकोनाचा परिचय देत सरळ मार्गाने जमीन खरेदी करण्यासाठी संमतीपत्र दिले आहे. शासनाकडून पाचपट मोबदला दिला जाईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
पुलाचे पोचमार्गासह बांधकाम करण्याकरीता गोपालखेड येथील ४.१७ हे.आर. जमीन संपादीत करण्यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या अलाईनमेंट मध्ये बदल झाल्याने नव्याने जमीन संपादनाची गरज भासली.
नव्याने जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. परंतु पुलाचे बांधकाम करणे अपरिहार्य असल्याने जमीन संपादनासाठी संबंधीत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी, महसुल विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या समवेत आमदार रणधीर सावरकर यांनी बैठक घेवून प्रशासनाला तसेच शेतकऱ्यांना मार्ग काढण्याची विनंती केली होती.
पुलाचे पोच मार्गासाठी नव्याने संपादीत करावयाच्या ४.२० हे.आर. जमीनीची संयुक्त मोजणी करुन नव्याने भुसंपादन प्रकरण नोंदविण्यात आले. सरळ खरेदीचे भुसंपादन करण्याबाबत प्रस्तावाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. १२ डिसेंबर रोजी गोपालखेड येथील २७ शेतकऱ्यांच्या वतीने विजय मोडक, गजानन हरिचंद्र मार्के, बाबाराम मोडक, निलेश मोडक, अजय मोडक, सुनिल मोडक, सारंगधर मार्के आदिंनी भुसंपादनासाठी आवश्यक समंतीपत्र उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांना सादर केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.