आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्ग माेकळा:जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांच्या पदभरतीचा मार्ग माेकळा

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांच्या भरतीचा मार्ग माेकळा झाला आहे. शिक्षण विभागात हालचालीही सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची मंजूर ८५ पैकी ६५ पदे रिक्त आहेत. शासन सामाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या संधी समानतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी काेट्यवधी रुपये खर्च करते. वेतन, अनुदान, पाठ्यपुस्तके, भाैतिक सुविधा, पाेषण आहारासह इतरही बाबींवर निधी खर्च करण्यात येते.

मात्र तरीही जि.प.चा शैक्षणिक दर्जा काँन्व्हेंटच्या तुलनेने अगदी सुमार आहे. याला शिक्षकांना शिक्षणबाह्य कामे देणे, रिक्तपदांसह अन्य बाबीही जबाबदार आहेत. दरम्यान शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आदेश जारी करीत केंद्रप्रमुखांची ५० टक्के पदे पदाेन्नतीने आिण ५० टक्के पते ही मर्यादीत िवभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचा आदेश जारी केला आहे. अशी हाेणार प्रक्रियाकेंद्र प्रमुखासाठी २०० प्रश्नांची, २०० गुणांची लेखी परीक्षा हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...