आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका पुन्ह;महावितरणला बसला आहे.अनेक ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या, टिनपत्रे महावितरण खांबावर येऊन पडल्याने १४५ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रीपासूनच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. १२० पेक्षा अधिक गावांचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे. तर उर्वरित वीजपुरवठा लवकरच पूर्ववत सुरु होईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली. जिल्ह्यात काल पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.
वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने बाळापूर, पारस या ११ केव्ही वाहिनीवर झाड पडल्याने १२ खांब तुटले, वाकल्याने वीज वाहिनी जमिनदोस्त झाली होती. त्यामुळे ३३ केव्ही बाळापूर उपकेंद्र बंद पडले होते. याशिवाय अनेक ठिकाणी टिनपत्रे, झाडाच्या फांद्या वीज वाहिन्यावर अडकल्याने ४० ते ५० लघूदाबाचे खांब वीज वाहिन्यासहीत पडले आहे. पारस येथील चार ठिकाणाचे रोहित्र हे जमिनीलगत झुकले आहे.
बाळापूर उपकेंद्राचा वीज पुरवठा रात्रीलाच पुर्ववत करण्यात आला आहे. पारस परिसरात वादळाचा परिणाम जास्त झाल्याने महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे.अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट वीज दुरूस्तीसाठी पारस येथे हजर आहेत. शहरातील ३३ केव्ही एमआयडीसी, ३३ केव्ही सुधीर कॉलनी, ३३ खडकी, ३३ केव्ही वाशीम बायपास आणि ३३ केव्ही शिवाजी उपकेंद्राशी निगडीत वीज वाहिन्यांवरील ६० ते ७० पीन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर फुटल्याने हे उपकेंद्र बंद पडली होती. परंतु काही तासातच शहरातील वीज पुरवठा पुर्ववत करण्यात यश आले. उपकेंद्र ते उपकेंद्र जोडणाऱ्या ३३ केव्ही एमआयडीसी ते ३३ केव्ही वणी रंभापूर या वाहिनीवर झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने ही वाहिनी क्षतीग्रस्त होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता.
३३ केव्ही बोरगाव ते ३३ केव्ही कानशिवणी वाहिनीचे दोन खांब पडल्याने वीज वाहिनी बंद पडून वीजपुरवठा खंडित झाला होता.३३ केव्ही कानशिवणी ते ३३ केव्ही कंझारा लाईनवरील २७ पीन इन्सुलेटर व ६ व्ही ग्लास फुटल्याने वीज वाहिनी तुटली होती. तसेच ३३ केव्ही वणी रंभापूर ते ३३ केव्ही अंभोरा वीज वाहिनीचे २ खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.