आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola, A Pothole Was Formed In The Road Due To Neglecting The Repair Work Of The Broken Water Channel For Three And A Half Months; Waste Of Thousands Of Liters Of Water

अकोल्यात साडेतीन महिन्यापासून फुटलेल्या जलवाहिनीच्या कामास सुरुवात:दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यात झाला होता खड्डा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक वाटिके जवळ उड्डाणपूलाच्या लॅन्डींग खालील मागील साडेतीन महिन्यापासून फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान नेहरु पार्क चौकात महापालिकेचा जलकुंभ आहे. या जलकुंभातून 350 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी अशोक वाटिकेतून जेल चौकाकडे जाते. अशोक वाटिका चौकातून उड्डाण पुल जातो. अशोट वाटिका चौैकातुन मूर्तिजापूर मार्गाकडे उड्डाणपुलाची लॅडींग आहे. या लॅडींगच्या खाली बहुधा पुलाचे काम करताना ही जलवाहिनी क्षतीग्रस्त झाली असावी. मात्र अनेक दिवस या जलवाहिनीतून पाण्याची गळती झाली नाही. परंतु आता गेल्या साडेतीन महिन्यापासून पाण्याची गळती सुरु आहे. जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर साचते. हा रस्ता डांबरी आहे. दर तीन दिवसाआड पाण्याची गळती होत असल्याने डांबर वाहुन गेले असून या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. मात्र आता नॅशनल हायवेने या फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला आहे. जलवाहिनी दुरुस्तीस तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे.

कमी दाबाने सुरु होता पाणी पुरवठा

अशोक वाटिका चौकातून गेलेली 350 मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी जेल चौकात जाते. या जलवाहिनीला पुढे 300 मिमी, 200 मिमी आणि अखेरीस 110 मिमी जलवाहिन्या जोडलेल्या आहेत. या जलवाहिनीतून दक्षता नगर, पोलिस क्वार्टर, कैलास टेकडी, निमवाडी, पोलिस हेडक्वार्टर्स आदी भागाला पाणी पुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्याने या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. जलवाहिनी दुरुस्ती नंतर या भागाला दाबाने पाणी पुरवठा होईल.

हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नेहरु पार्क जलकुंभातून ज्या-ज्या वेळी पाणी पुरवठा केला जातो. त्या-त्या वेळी या जलवाहिनीतून पाण्याची गळती होते. त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

बातम्या आणखी आहेत...