आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडून मृत्यू:पालखीसोबत आलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

पिंजर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालखी सोबत आलेल्या वाशीम जिल्ह्यातील युवकाचा पिंजर जवळील दोनद येथील काटेपूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

रोहन प्रदीप भिवरकर वय २२ रा. वीरगव्हाण ता. कारंजा जि. वाशीम असे मृत युवकाचे नाव आहे. राेहन शुक्रवारी सायंकाळी निंभा जहागीर येथील पालखी शेगावसाठी मार्गस्थ झाला होता. शुक्रवारी पालखी विश्रामसाठी दोनदला थांबली. तेथे रोहनने आंघोळ करण्यासाठी काटेपूर्णा नदीपात्रातील डोहात उडी घेतली. नंतर तो बाहेर आला नाही. याची माहिती दोनद येथील आसरा माता जीव रक्षक दलाचे तेजस सुर्वे, शिवम अनारसे, विठ्ठल ठाकूर, शंकर लोनग्रे, गोपाल उजवने, आदित्य नागे यांना मिळताच त्यांनी रोहनला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. जीवरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला बाहेर काढले. पिंजर पोलिसांना याची माहिती मिळताच पीएसआय बंडू मेश्राम, शिपाई रोशन पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी याची माहिती त्याच्या कुटुंबाला दिली. पुढील तपास ठाणेदार वाढवे, पीएसआय बंडू मेश्राम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...