आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात महावितरणची कारवाई:बाळापूर तालुक्यातील 21 जणांकडून 47 हजार 546 युनिटची चोरी; 12 लाखांचा दंड वसूल

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण प्रशासन दक्ष झाले आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात मागील काही तासात 21 ठिकाणी वीज चोऱ्या पकडल्या. या वीज चोरांकडून साडेपाच लाख रुपयांच्या वीज देयकासह 12 लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.

महावितरणच्या सर्जिकल स्ट्राइकमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत. येत्या काळात अशीच कारवाई महावितरणकडून जिल्ह्यातील अन्य तालुक्यात करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महावितरणच्या बाळापूर उप विभागात येणाऱ्या अडोशी, जोगलखेड, बाळापूर शहर, मानकी, पारस, निमखेडा, बाटवाडी, व्याळा या ठिकाणी वीज मीटरमध्ये अनधिकृतपणे छेडछाड करून वीज वापर करण्याऱ्या फुकट्या वीज ग्राहकांवर धाड टाकण्यात आली. मानकी गावात 6, पारसमध्ये 3, आडोशी आणि बाळापूरमध्ये प्रत्येकी 2 ठिकाणी महावितरणकडून कारवाई करण्यात आली.

अशी करीत होते वीजचोरी

विजेची मागणी वाढल्याने वीज यंत्रणेवर भर वाढला असून अनधिकृत आकडे टाकून आणि वीज मीटरमध्ये छेडछाड करून काही जण वीज चोरी करीत असल्याने काही ठिकाणी महावितरणची उपकरणे खराब झाल्याची बाब निदर्शनास आल्यावर महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली. या अगोदर अश्याच प्रकारची कारवाई मूर्तिजापूर, बोरगाव मंजू या ठिकाणी पण करण्यात आली होती. वीजचोरी करणाऱ्या वीज ग्राहकांनी महावितरणची 47 हजार 546 युनिट वीज फुकटात वापरल्याचे आढळून आले. महावितरणकडून या फुकट्या वीज ग्राहकाकडून 5 लाख 38 हजार रुपयांचे देयक देऊन तेव्हडी रक्कम वसूल केली. सोबतच 12 लाख रुपयांचा दंड देखील वसूल केला.

बातम्या आणखी आहेत...