आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला शहरासह जिल्ह्यात तापमानाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून, मनुष्याप्रमाणे पशु-पक्ष्यांनाही तापमान वाढीचा अतोनात त्रास होत आहे. तापमानाच्या उच्चांकाने पक्ष्यांना थोडा तरी दिलासा मिळावा, या उद्देशाने वनमित्र तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील गोहर यांनी शहरातील विविध भागातील वृक्षांवर दरवर्षीप्रमाणे यंदाही २५१ जलपात्र लावून पशु-पक्ष्यांना तापमानातून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून हा उपक्रम राबवला आहे.
शहरातील विविध भागात स्वखर्चाने जलपात्रे विकत आणून ते वृक्षावर लावले तसेच काही नागरिकांना घरातील वृक्षावर लावण्याकरता दिले. उन्हाचा फटका पशु-पक्ष्यांना बसू नये, या उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते सुनिल गोहर व त्यांच्या मित्र मंडळी दर उन्हाळ्यात हा उपक्रम राबवते. पशु-पक्ष्यांकरता जलपात्र लावून मानव धर्माचे पालन प्रत्येकाने करावयास हवे त्यांचे मत आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून, गुढीपाडव्यापर्यंत त्यांनी जवळपास १०१ जलपात्र लावले तर उर्वरीत जलपात्र १ मे या महाराष्ट्र दिनापर्यंत लावून एकूण २०१ जलपात्र लावण्याचा संकल्प ते पूर्ण करणार आहेत. मुक्या प्राण्यांचा वाली कोण, त्यांच्याकडे लक्ष देण्याकरता सुनिल गोहर यांनी हा उपक्रम गेल्या १२ वर्षापासून राबवण्यास सुरूवात केली आहे.
तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या घराजवळील झाडावर किंवा टेरेस, छतावर पक्ष्यांकरता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यास त्यांचीही तहान भागू शकेल. सुनील गोहर हे राबवत असलेल्या पक्ष्यांकरता पाणपोई या उपक्रमाचे शहरातील गणमान्य नागरिकांकडून कौतूक केले जात आहे. त्यांच्या उपक्रमात ललीत भगत, शुभम गरड, बाळकृष्ण बिडवई, नंदू चोपडे, संस्कार गोहर,अनिल झुंज, हरनामसिंग रोहेल आदींचा सहभाग होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.