आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा एकही रुग्ण नाही:जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शून्य

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तसेच तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ९९ अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. सद्यास्थितीत एकही कोरोना रुग्ण शिल्लक नाही.

रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ६५ हजार १७९ झाली आहे. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ३ लाख २२ हजार ४१४ झाली आहे. आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शून्य
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ६५ हजार १७९ आहे. त्यात ११६५ मृत झाले आहेत. तर ६४ हजार १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्ण शिल्लक नाही.

बातम्या आणखी आहेत...