आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीमंत्री अब्दूल सत्तारांनी शेतकऱ्यांकडे फिरवली पाठ:सत्तार बळीराजाचे कैवारी नाहीत; शिवसेनेची टिका

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय कार्यक्रमात सहभागी झालेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असून, ते बळीराजाचे कैवारी नाहीतच, अशा शब्दात दोन्ही जिल्हा प्रमुखांनी शनिवारी ( 03 सप्टेंबर ) टिकास्त्र सोडले.

सत्तारांनी शेतकऱ्यांकडे फिरवली पाठ

सत्तार यांनी शिवसेनेवर शुक्रवारच्या दौऱ्यात टिका केली होती. यावर आता शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख व जिल्हाप्रमुख गोपाल दातकर प्रत्यत्तुर दिले. सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली नसून, त्यापेक्षा त्यांना गद्दार असलेल्या शिंदे गटाचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महत्त्वाचा वाटला, अशा शब्दात शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकाराचा समाचार घेतला.

सत्तार शेतकऱ्यांचे कैवारी नाहीत

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मध्यंतरीच्या काळात खताचाही प्रचंड तुटवडा होता. याबाबत कृषीमंत्री सत्तार यांनी दौऱ्यात बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र कृषीमंत्र्यांनी साधी बैठक घेतली नाही, असे शिवसेनेचेही म्हणणे आहे. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी चर्चा करूनच तत्कालीन ठाकरे सरकारने कोट्यावधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. त्यामुळे पक्ष प्रमुख वेळ देत नव्हते, असा आरोप धादांत खोटा आहे. शेतकरी संकटात असतानाही कृषिमंत्री सत्तार यांच्याकडे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचे अश्रू पुसण्यासाठी वेळ नव्हता. त्यांनी गद्दार शिंदे गटाच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला शासकीय काम सोडून हजेरी लावण्यातच धन्यता मानली. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याशी संवाद न साधणारे शिंदे-फडणवीस सरकारमधील ना सत्तार व त्यांचे गद्दार साथीदार शेतकऱ्यांचे कैवारी असूच शकत नाहीत, अशा शब्दात शिवसेना जिल्हा प्रमुखांनी तोफ डागली.

कर्जमुक्ती सुरूवातच ठाकरे सरकारची

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकाराने शेतकरी कर्जमुक्ति योजना राबविली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान देण्याचा निर्णयच ठाकरे सरकारचा आहे. केवळ सकाळी ६ वाजता उठून चालत नाही, तर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्यासाठी योजनाही राबवाव्या लागतात, असाही टोला शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी लगावला आहे.

गद्दारांनी आधी राजीनामा द्यावा

महाविकास आघाडीत अन्यायाची जाणीव या गद्दारांना अडीच वर्षांनंतर कशी झाली, आतापर्यंत ते गप्प का होते, असे सवाल शिवसेना नेत्यांनी केले आहेत. गद्दार आमदारांची संख्या 40 वरून 80 पर्यंत नेण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी राजीनामा द्यावा. शिवसेनेच्या भरवशावर निवडून आलेल्या अब्दुल सत्तार यांच्यासारख्या गद्दांरांच्या तोंडून स्वाभिमान, उठावाची भाषा शोभत नाही, असेही शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...