आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची हजेरी:मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात परिणामकारक वाढ नाही; काटेपूर्णात 25.52 तर वानमध्ये 34.73 दलघमी जलसाठा

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम तसेच लघु प्रकल्पाच्या पातळीत परिणाम कारक वाढ झालेली नाही. तूर्तास जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात 25.52 तर वानमध्ये 34.73 दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.

नजरा जलसाठ्याकडे

जिल्ह्यात काटेपूर्णा आणि वान हे दोन मोठे तर मोर्णा, निर्गुणा आणि उमा हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांवर अकोला शहरासह विविध गावांना पाणी पुरवठा केला जातो. तसेच सिंचनासाठी पाणी दिले जाते. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की या प्रकल्पाच्या जलसाठ्याकडे जिल्हा वासीयांच्या नजरा लागलेल्या असतात. मागील वर्षी जोरदार पाऊस झाल्याने हे सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते.

परिणामकारक वाढ नाही

गेल्या दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. मात्र, या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पाच्या पातळीत परिणामकारक वाढ झाली नाही. जिल्ह्यातील सर्वातमोठा काटेपूर्णा प्रकल्प हा काटेपूर्णा नदीवर आहे. काटेपूर्णा नदीचा उगम वाशिम जिल्ह्यात आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मेडशी, मालेगाव आदी परिसरात जोरदार पाऊस झाला की काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होते.

प्रकल्पातील जलसाठा असा

- काटेपूर्णा प्रकल्प - 25.52 दलघमी - वान प्रकल्प - 34.73 दलघमी - मोर्णा प्रकल्प - 14.99 दलघमी - निर्गुणा प्रकल्प - 7.51 दलघमी - उमा प्रकल्प - 0.97 दलघमी

बातम्या आणखी आहेत...