आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘मध्यवर्ती’ शाखेत काेविडकाळात निर्माते आणि रंगकर्मींना मदत करण्याकामी काेणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. २०१९ ते २०२२ अशा तीन वर्षांचे कामकाज वार्षिक सभेने मंजूर केले आहे. त्यामुळे गैरव्यवहार झाला किंवा केला अशी चुकीची माहिती परिषदेचेच काही लाेक माध्यमांपर्यंत हेतुत: पाेहाेचवत असल्याचे परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना स्पष्ट केले.
नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. १०) पार पडली. त्यानंतर कथित गैरव्यवहाराबाबत चुकीची माहिती पसरवली गेली असल्याचे सांगत कांबळी म्हणाले की, ३१ मार्च २०२० राेजी धर्मादाय आयुक्तांनी विविध संस्थांनी त्यांच्या आपत्कालिन फंडातून मदत करावी म्हणून ‘हात द्या साथ द्या’ असे आवाहन केले हाेते. त्यानुसार राज्यपालांनी संस्थेला दिलेल्या १ काेटी रुपयांच्या एफडीवर जे व्याज मिळाले त्यातून गरजूंना मदत करण्यात आली. त्या माध्यमातून १ काेटी २० लाख रुपये मदत रंगकर्मींना केली गेली आहे.
नाट्यसंकुलाला फायर एनआेसीचा अडसर नाट्य परिषदेला यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातून निधी मिळताे. मात्र, त्याच्या दुरवस्थेमुळेच ते बंद असल्याचा जाे आराेप झाला ताेसुद्धा चुकीचा आहे. मुळात २००५ पासून या संकुलाला फायर एनआेसीच नाही. त्यामुळे सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार हे संकुल बंद आहे. त्याचे आता पुन्हा काम करण्यासाठी प्रयत्न सुरूच असल्याचे कांबळी यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.