आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालढकल:उड्डाणपुलाखालील 700 मिलिमीटरची जलवाहिनी वळवण्याचा प्रस्तावच नाही

अकोला / श्रीकांत जोगळेकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलाच्या अशोक वाटिकेजवळील लॅडिंग खालील जलवाहिनी फुटण्याचा प्रकार काही दविसापूर्वीच घडला असताना अलायन्स चर्चसमोरील या पुलाच्या अॅप्रोचखालून देखील ७०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी गेलेली आहे. मात्र अॅप्रोच खालून गेलेली ही जलवाहिनी वळवण्याचा किंवा बदलण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने अद्यापही तयार केला नाही. दुर्देवाने ही जलवाहिनी फुटल्यास पाच जलकुंभांचा पाणी पुरवठा ठप्प होईल.

अशोक वाटिका चौकात उड्डाणपुलाच्या म्ूर्तिजापूरकडे जाणाऱ्या लॅडिंग खालून गेलेली ६०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी १९ डिसेंबर रोजी फुटली होती. यामुळे लॅडिंगवरील वाहतूक बंद करावी लागली तर दुसरीकडे शहरातील आठ जलकुंभांचा पाणीपुरवठा आठ दविस ठप्प झाला होता. लॅडिंग खालून गेलेली जलवाहिनी हलवून आता पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र महापालिकेने या घटनेपासून महापालिका पाणीपुरवठा विभागाने कोणताही धडा घेतलेला नाही. कारण याच पुलावर अशोक वाटिकेसमोर अलायन्स चर्च समोरुन उड्डाणपुलावर चढण्यासाठी अॅप्रोच रस्ता आहे. या अॅप्रोच खालून ६५ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्रातील ७०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी गेलेली आहे. उड्डाणपुलाचे विशेषत: लॅडिंगचे काम करण्यासाठी या जलवाहिन्या बदलणे गरजेचे होते. मात्र याकडे नॅशनल हायवे विभाग आणि महापालिकेने दुर्लक्ष केले. याचा फटका नॅशनल हायवे आणि महापालिकेला बसला. लँडिंग खालून गेलेली जलवाहिनी फुटल्याने लँडिंगमधील राख बाहेर आल्याने लँडिंग कुमकुवत झाले आहे.

या जलकुंभांचा पाणीपुरवठा होईल ठप्प अॅप्रोच खालून गेलेली जलवाहिनी दुदैवाने तांत्रिक कारणामुळे फुटल्यास अकोट फैल येथील दोन, रेल्वे स्थानकासमोरील दोन आणि मराठी शाळा परिसरातील एक अशा पाच जलकुंभांचा पाणी पुरवठा ठप्प होईल. याचा फटका एक लाख २८ हजार लोकसंख्येला बसेल.

बातम्या आणखी आहेत...