आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेत आयुक्ता व्यतिरिक्त (कार्यकारी अभियंता बांधकाम) वगळता खऱ्या अर्थाने एकही वरिष्ठ अधिकारी नाही. त्यामुळे प्रत्येक कामासाठी विभाग प्रमुखांनाच आयुक्तांशी संपर्क साधावा लागतो. विषयाची माहिती आणि प्रस्तुतीकरणात विभाग प्रमुख काही प्रमाणात कमी पडतात. या प्रकारामुळे विभाग प्रमुखांना बोलणीही खावी लागतात. परिणामी विभाग प्रमुख त्रस्त झाले आहेत.
महापालिकेत उपायुक्ताची दोन्ही पदे रिक्त आहेत. तसेच सहाय्यक आयुक्ताची चारही पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोणत्याही विभागातील फाईल आयुक्तांकडे आली की ती संपूर्णपणे तपासण्याची जबाबदारी आयुक्तांवर येवून पडली आहे. किमान सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त नियुक्त असल्यास ते या फाईल्सचे निरिक्षण करुन त्रुट्या दूर करण्याचे आदेश देतात. मात्र तुर्तास या सर्व बाबी आयुक्तांनाच कराव्या लागत आहेत. त्यामुळे फाईल घेवून आलेल्या विभाग प्रमुखाला अथवा तत्सम कर्मचाऱ्याला या फाईल्स अर्थात प्रकरणाचा, विषयाचा परिपूर्ण अभ्यास करावा लागतो. हा विषय महत्वाचा कसा? ही बाबही पटवुन द्यावी लागते. त्यामुळे विभाग प्रमुख अथवा फाईल आयुक्तांपर्यंत घेवून येणाऱ्या कर्मचाऱ्याची तारांबळ उडत आहे. काही कर्मचाऱ्यांना प्रेझेटेशन करता येत नाही त्यामुळे परिपूर्ण माहिती असतानाही ते प्रकरणाचा उलगडा करु शकत नाही. तर काही कर्मचाऱ्यांना विषयाची परिपूर्ण माहितीच नसते. या सर्व प्रकारामुळे अनेकांना प्रशासनाच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. तर दरमहा वेतन दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या विषयाची फाइल आयुक्तापर्यंत न्यावीच लागते. मात्र, एखाद्या विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियुक्त करायचा असला तरी संबंधित फाईल आयुक्तांपर्यंत पोचवावी लागते. यावरुन महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे का महत्वाची आहेत? ही बाब स्पष्ट होते.
गेल्या काही दिवसापासून कामा बद्दल अनेक कर्मचाऱ्यांना प्रशासनाची बोलणी खावी लागली आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या मन:स्थितीत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीचे अर्जही लिहिले होते. मात्र अन्य कर्मचाऱ्यांनी समजुत काढल्या नंतर काही कर्मचाऱ्यांनी सेवा निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.