आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेशवनगर रिंग रोडवरील काळे मार्केटमधील एटीएमवर गुरुवारी पहाटे चौघांनी एटीएम फोडून लाखोंची चोरी केली होती. ही चोरी करणारे चोरटे ज्या गाडीने अकोल्यात आले होते, त्या गाडीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून शाेध घेत पोलिस चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, पोलिसांना सुगावा लागलेला नाही.
एटीएमला लक्ष करीत गॅस कटरने कॅश बॉक्स कापून चोरट्यांनी रिंगरोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून १६ लाख ५४ हजार लंपास केले होते. पहाटे ३ वाजताच्या सुमारास एटीएममध्ये तोंडावर काळे कापड बांधून शिरलेल्या चौघांनी सीसीटिव्हीची तोडफोड केली. त्यानंतर गॅस कटरच्या मदतीने एटीएमचा कॅश बॉक्स कापून रोख रक्कम लंपास केली.
पोलिस तपासातील प्राथमिक माहितीनुसार चार चोरांनी ही रक्कम चोरल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांनी वापरलेल्या कारचा शाेध पोलिस घेत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून हा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात प्रगती असून, चोरटे जेरबंद होतील, असा विश्वास खदान स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीरंग सनस यांनी व्यक्त केला.
गाडीचा नंबर शोधण्याचा प्रयत्न
रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये चोरट्यांच्या कारचा क्रमांक स्पष्ट दिसून आला नाही. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत आहे. त्यासाठी स्पष्ट फुटेज मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.