आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:चोरट्याने दिवसा कडीकोंडा तोडून‎ दीड लाखांचे दागिने नेले चोरून‎

अकोला‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळपासून लॉक लावून असलेल्या घराला‎ सायंकाळी चोरट्याने लक्ष्य केले. त्याने लॉक‎ तोडून घरातून दीड लाख रूपयांचा ऐवज चोरून‎ नेला. ही घटना जुने शहरातील गीता नगरामध्ये‎ घडली. दरम्यान चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला‎ असून, जुने शहर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.‎ जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीमधील गीता नगर‎ येथील स्प्रिंग रेस्टॉरंट येथे काल सायंकाळी पाच‎ वाजून आठ मिनिटांनी एका भुरट्या चोराने घरी‎ कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून‎ घरातील अंदाजे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल‎ चोरून नेला.

घरमालक सुनीता इंगळे या सकाळी‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे श्रामनेर‎ शिबिराच्या सांगता समारोपासाठी गेल्या होत्या.‎ कार्यक्रम आटोपून त्या घरी गेल्या असता घराचा‎ कोंडा तुटलेला व घरातील कपाट फोडलेले‎ दिसले. त्यामधील अंदाजे दीड लाख रुपये‎ किंमतीचे दागदागिने अज्ञात चोरट्याने चोरून‎ नेले.

याबाबत जुने शहर पोलिसांत तक्रार‎ दाखल केली असून, जुने शहर पोलिस व‎ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी‎ दाखल झाले होते. यासोबतच उपविभागीय‎ पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर यांनी‎ सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन घटनेची‎ माहिती जाणून घेतली. आरोपीने घरी कोणी‎ नसल्याचा फायदा घेत ही चोरी केल्याचे दिसून‎ येत आहे. याबाबत आरोपी हा सीसीटीव्ही‎ कॅमेऱ्यात सायंकाळी पाच वाजून आठ‎ मिनिटांनी कैद झाला आहे. आता याबाबतचा‎ पुढील तपास जुने शहर पोलिस ठाण्याचे‎ ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...