आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणामध्ये अचानक बदल झाला असून, किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी, ९ डिसेंबरला जिल्ह्यातील किमान तापमानाची ११.३ अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या हिवाळ्यातील हे निचांकी तापमान आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.
दरम्यान या संदर्भात हवामान अभ्यासकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तमिळनाडू किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वातावणात बदल दिसत आहे. गुरुवारी ८ डिसेंबरला जिल्ह्यात थंडीमध्ये अचानक वाढ झाली. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि हवेत कमालीचा गारवा होता. त्यामुळे सकाळी आणि रात्री रस्ते लवकरच निर्मनुष्य झाले होते.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ९ डिसेंबरलादेखिल जिल्ह्यातील किमान तापमानात आणखी घट झाली. पारा ११.३ अंशावर नोंदवला गेला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान ठरले. गेल्या पाच दिवसात किमान तापमान तब्बल ७.२ अंशाने घटले आहे.
२०१८ मध्ये ५.९ अंशावर जिल्ह्यातील किमान तापमानाची गेल्या दहा वर्षातील डिसेंबर महिन्याची परिस्थिती पाहता २९ व ३० डिसेंबर २०१८ मध्ये ५.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. २०१२ पासून आजपर्यंत म्हणजे गेल्या दहा वर्षातील डिसेंबर महिन्यात सहा वेळा किमान तापमान ९ अंशांच्या आत आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.