आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पंतप्रधानांसोबत प्रत्यक्ष संवादाचे ते क्षण अनमोल; ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये अकोल्यातील लेकींचा प्रत्यक्ष सहभाग; विद्यार्थ्यांनी सांगितला अनुभव​​​​​​​

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्या जिल्ह्यातील लहानशा गावातून शालेय जीवनातच थेट पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याची कल्पना स्वप्नातही केली नव्हती. त्यामुळे दिल्ली येथील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातील प्रत्येक क्षण आमच्यासाठी अनमोल होता, असे भावोद्गार अकोल्यातील नवोदय विद्यालयांच्या लेकींनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्ली येथे शुक्रवारी ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रम संपन्न झाला. यानिमित्त येथे चित्रकला, मूर्तीकला, नृत्यकला अशा विविध कलाप्रकारातील प्रदर्शन भरवण्यात आले. यात चित्रकला प्रकारामध्ये देशातील १३ मुलांमध्ये अकोल्यातील नवोदय विद्यालयाच्या ४ मुलींचा सहभाग होता. यामुळे अकोलेकरांसाठी हा दिवस अभिमानास्पद ठरला.

अकोल्यातील नवोदय शाळेमध्ये आजादिका अमृत महोत्सव अंतर्गत चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायत्री लांडे, तेजस्विनी घोरमारे, आयुषी गजभिये आणि अनुष्का खेवले यांनी सिंधूताई सपकाळ, विवेकानंद, अब्दुल कलाम, राजीव गांधी आदींचे चित्र रेखाटले. त्यांचे हे चित्र नवोदय शाळेच्या राष्ट्रीय समितीकडे पाठविले. त्यांनी ‘चाय पे चर्चा’ उपक्रमाच्या स्पर्धेसाठी ही चित्रे पाठवली आणि या चित्रांची उपक्रमासाठी निवड झाली.

शुक्रवारी हा उपक्रम पार पडला.यावेळी प्रदर्शनास्थळी गायत्री लांडे हिने पंतप्रधानांना त्यांनी रेखाटलेल्या चित्राची माहिती दिली. नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणे हे अकोला जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे यानिमित्त शाळेचे प्राचार्य राजेंद्र चंदनशिव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...