आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:तीन आरोपींना अटक; पाणवठ्यात युरिया टाकून 12 वन्य प्राण्यांची हत्या

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला पातूर आलेगाव वन परिक्षेत्रातील पाणवठ्यात युरिया टाकून १२ वन्यप्राण्यांची हत्या केल्याचा प्रकार बुधवारी ८ जूनला उघडकीस आला. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली असून, त्यांना शुक्रवारी १० जूूनला तीन दिवसांची वनकोठडी ठोठावली. मृत प्राण्यांमध्ये १० माकड, १ नीलगाय, १ काळवीट आणि १ पक्ष्याचा समावेश आहे.

पातूर तालुक्यात आलेगाव वनपरिक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यावर बुधवारी ८ जूनला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गस्त घालताना १० माकड, १ काळविट, १ पक्षी आणि १ नीलगाय मृताअवस्थेत आढळले. शिकारीच्या दृष्टीने नीलगायचे मुंडके आणि पाय कापून नेले होते. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी शोधमोहिम राबवली. या वेळी परिसरातील एका आरोपीच्या शेतात रक्ताने माखलेले हत्यार, दगड सापडले.

बातम्या आणखी आहेत...